शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

Corona Vaccine : नाशिकच्या युवकाला दिला कागदोपत्रीच दुसरा डोस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 5:53 AM

Corona Vaccine : सचिन सांगळे या युवकाने गेल्या ७ ऑगस्ट २०२१ रोजी नांदूरशिंगोटे येथील केंद्रात पहिला डोस म्हणून कोविशिल्ड लस टोचून घेतली होती. दुसऱ्या डोससाठी त्यांना ३० ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर २०२१ यादरम्यानची मुदत देण्यात आली आहे.

नाशिक : कोरोनाची लस न घेताच लाभार्थ्यांना प्रमाणपत्र प्राप्त होण्याचे प्रकार नवीन नाहीत. परंतु, दुसरा डोस घेण्याची तारीख येण्यापूर्वीच लस घेतल्याचे प्रमाणपत्र प्राप्त होणे आणि तेसुद्धा परराज्यातून. हा अजब प्रकार घडला आहे नांदूरशिंगोटे (ता. सिन्नर) येथील युवकाबाबत. सचिन सांगळे या युवकाने गेल्या ७ ऑगस्ट २०२१ रोजी नांदूरशिंगोटे येथील केंद्रात पहिला डोस म्हणून कोविशिल्ड लस टोचून घेतली होती. दुसऱ्या डोससाठी त्यांना ३० ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर २०२१ यादरम्यानची मुदत देण्यात आली आहे. तत्पूर्वीच दि. २२ ऑक्टोबर रोजी या युवकाला मोबाईलवर दुसरा डोस घेतल्याचा मेसेज आला. हा मेसेज पाहिला असता सांगळे चक्रावून गेले. त्यांना दुसरा डोस घेतल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाले, तेसुद्धा छत्तीसगढ प्रांतातील रालगढ येथील अलोला केंद्राचे. त्यामुळे सांगळे आणखीनच पेचात सापडले. 

लसीकरणाची ऑनलाईन नोंदणी करताना अनवधानाने एखाद्या ठिकाणी मोबाईल क्रमांकातील एखादा क्रमांक चुकीचा गेला, तर असा प्रसंग घडतो. त्यामुळे ही तांत्रिक अडचण निर्माण होऊ शकते. - डॉ. मोहन बच्छाव, तालुका आरोग्य अधिकारी, सिन्नर.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या