सुयोग जोशीलोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : प्रयागराज येथे कुंभात झालेल्या दुर्घटनेनंतर राज्य शासनही सजग झाले असून, गर्दी आटोक्यात यावी, वाहतुकीचे नियोजन सुरळीत व्हावे, यासाठी प्रशासनातर्फे अडीच हजार सीसीटीव्हींची नजर ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, गुगलच्या मदतीने मोबाइल लोकेशनवर गर्दीचे नियंत्रण मिळविले जाणार असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महापालिकेने आराखडा करण्यास सुरुवात केली आहे.
रस्त्यांची माहिती मिळणार, भाविकांचा वेळ वाचणारवाहतूक व्यवस्थेच्या आराखड्याला आणखी बळकटी देण्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासन गुगलसोबत थेट बैठक घेणार आहे. आराखडा गुगलला उपलब्ध करून दिल्यानंतर जगभरातून येणाऱ्या भाविकांना गुगल मॅपच्या माध्यमातून रस्त्यांची आणि पर्यायी रस्त्यांची अद्ययावत माहिती मिळणार आहे. यामुळे भाविकांचा वेळ वाचेल. महापालिकेच्यावतीने विशेष सॉफ्टवेअर विकसित करण्याचे काम सुरू आहे.
तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसमावेशक आराखडा कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविकांचे नाशिकमध्ये आगमन होणार असल्याने गर्दी नियंत्रण आणि वाहतूक नियोजन हे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका व शहर पोलिस दलाने एकत्रितपणे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यास सुरुवात केली आहे. या आराखड्यात महत्त्वाचा भाग म्हणजे शहरात तब्बल अडीच हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
Web Summary : Nashik administration will use 2500 CCTV cameras and Google Maps for Kumbh Mela crowd control. Real-time traffic updates and alternative routes will aid pilgrims, saving time and ensuring smooth flow.
Web Summary : नासिक प्रशासन कुंभ मेले में भीड़ नियंत्रण के लिए 2500 सीसीटीवी कैमरे और गूगल मैप्स का उपयोग करेगा। वास्तविक समय यातायात अपडेट तीर्थयात्रियों को समय बचाने और सुचारू प्रवाह सुनिश्चित करने में मदद करेगा।