शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

टोळधाडीवर दोन दिवसात नियंत्रण मिळविणार - कृषिमंत्री दादा भुसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 15:50 IST

टोळधाडीचे दोन थवे सध्या कार्यरत आहेत. पारशिवनी तालुक्यात सध्या उद्रेक सुरू आहे.

नागपूर : टोळधाडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग पूर्णत: प्रयत्न करीत आहे. येत्या दोन दिवसात यावर नियंत्रण मिळवले जाईल, असा विश्वास राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला. नियंत्रणासाठी ड्रोनने फवारणीचे नियोजन आहे. मात्र याचा दुष्परिणाम  जलसाठ्यावर होऊ नये, याची देखील काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे यावर आज सायंकाळपर्यंत निर्णय घेतला जाईल.टोळधाडीचे दोन थवे सध्या कार्यरत आहेत. पारशिवनी तालुक्यात सध्या उद्रेक सुरू आहे. फायर ब्रिगेडच्या माध्यमातून यावर नियंत्रण राखण्यात बर्‍यापैकी यश आलेले आहे. क्लोरोफाइमफोर्स या कीटकनाशकाची आतापर्यंत पाचशे लिटर फवारणी झालेली आहे. टोळधाडीमुळे भाजीपाला तसेच संत्रा, मोसंबी या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यासंदर्भात आढावा घेण्याच्या सूचना कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. टोळधाडीमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीचा समावेश पीकविम्यामध्ये करता येईल काय, या संदर्भात केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाशी चर्चा केली जात आहे.राज्यात अलीकडे प्रथमच असा प्रसंग निर्माण झाल्याने त्याबद्दल केंद्राचे देखील मत विचारात घेतले जाणार आहे. बियाणे व खतांची टंचाई पडणे तसेच त्याचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता कृषी विभागाकडून घेतली जात आहे. एक हजार टन बियाणे आणि एक लाख टन खताचे वाटप आजवर झालेले आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती अभियान योजनेत आतापर्यंत 32 लाख शेतकऱ्यांचे अर्ज आले आहेत, त्यातील 30 लाख अर्ज पात्र ठरले असून, 19 लाख शेतकऱ्यांना 12 हजार कोटी रुपयांचे कर्ज त्यांच्या खात्यावर वर्ग केले आहे, कोरोनाच्या प्रकोपामुळे प्रक्रिया लांबली. त्यामुळे याला थोडा विलंब झाला आहे.