शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांची चौकशी सुरूच ठेवा

By admin | Updated: July 23, 2015 02:30 IST

राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्धच्या ‘मनी लॉन्ड्रिंग

मुंबई : राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्धच्या ‘मनी लॉन्ड्रिंग’ आणि जमीन बळकावण्यासंबंधीच्या कोणत्याही आरोपाचा तपास बंद न करता तो पुढे सुरू ठेवावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी राज्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीतील अंमलबजावणी संचालनालयास (ईडी) दिला.आम आदमी पार्टीच्या अंजली दमानिया यांनी केलेल्या याचिकेवर न्यायालयाने याआधी भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांवरील आरोपांचा तपास ‘एसीबी’ व ’ईडी’ने संयुक्त तपासी दल स्थापन करून करावा, असा आदेश दिला होता. बुधवारी ही याचिका मुख्य न्यायाधीश न्या. मोहित शहा व न्या. ए. के. मेनन यांच्या खंडपीठापुढे पुढील सुनावणीसाठी आली, तेव्हा या दोन्ही तपासी यंत्रणांनी आतापर्यंत केलेल्या तपासाचा अहवाल सादर केला. तसेच एकूण नऊपैकी पाच आरोपांत आम्हाला तथ्य आढळले नसल्याने त्यासंदर्भात तपास बंद करण्यास परवानगी द्यावी, अशी त्यांनी विनंती केली.मात्र न्यायालयाने तपासाचा अहवाल वाचला आणि चौकशीस आणखी वाव असल्याचे आम्हाला दिसते, असे सांगून कोणतीही चौकशी बंद न करता ती पुढे सुरू ठेवावी, असे निर्देश दिले. यासाठी वेळ मागितल्यावर तपास पूर्ण करण्यासाठी ‘एसीबी’ला ३१ आॅक्टोबर, तर ‘ईडी’ला ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत न्यायालयाने दिली.पाच आरोपांबाबत आम्हाला तथ्य आढळले नाही, असे सांगून तपासी यंत्रणांनी चौकशी बंद करण्याचे ठरविले असूनही न्यायालय त्यांना तसे न करता तपास सुरू ठेवण्यास सांगू शकत नाही, असा आक्षेप भुजबळ यांच्यावतीने ज्येष्ठ वकील श्रीहरी अणे यांनी घेतला; पण तो अमान्य केला गेला. तपास केला जात असलेल्या एकूण नऊ आरोपांपैकी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या पुनर्बांधणीचे काम आणि कालिना येथील जमीन बळकावणे यासंबंधी ‘एसीबी’ने एफआयआर नोंदविले आहेत. याखेरीज भुजबळ कुटुंबीयांच्या कंपनीने प्रस्तावित केलल्या ‘हेक्स वर्ल्ड’ या गृहनिर्माण प्रकल्पाच्या संदर्भात नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. त्यात सुमारे दोन हजार लोकांकडून घरांसाठी ४४ कोटी रुपये घेऊनही त्यांना घरे न दिल्याचा आरोप आहे. (विशेष प्र्रतिनिधी)