शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

...हा तर करकरेंचा अवमान

By admin | Updated: May 14, 2016 02:47 IST

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींना क्लीन चिट देण्याचा प्रकार म्हणजे शहीद हेमंत करकरे यांचा अवमान असून, केंद्र व राज्यातील भाजपा सरकार सत्तेचा दुरुपयोग करून अशा महत्त्वाच्या खटल्यात ढवळाढवळ करीत

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींना क्लीन चिट देण्याचा प्रकार म्हणजे शहीद हेमंत करकरे यांचा अवमान असून, केंद्र व राज्यातील भाजपा सरकार सत्तेचा दुरुपयोग करून अशा महत्त्वाच्या खटल्यात ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.याबाबत प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात मलिक यांनी म्हटले आहे, की तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी २००८ साली घडलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करून साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहितसह इतर लोकांना अटक केली होती. त्यावेळी या प्रकरणातील आरोपींच्या सुटकेसाठी भाजपा नेते लालकृष्ण आडवाणी व सध्याचे गृहमंत्री हे पंतप्रधानांना साकडे घालत होते. त्यावेळी हेमंत करकरे यांनी या सर्व प्रकरणाचा खुलासा पंतप्रधान कार्यालयासमोर केला होता. करकरे हे या प्रकरणाचा तपास करीत असताना या बॉम्बस्फोटातील आरोपींवर पुष्पवृष्टी करण्याचे काम भाजपाचे लोक करीत होते. केंद्रातील सत्ता आल्यानंतर सध्याच्या एनआयएच्या प्रमुखांना १ वर्षाची मुदतवाढ देत सत्तेचा दुरुपयोग करून या प्रकरणातील आरोपींना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. हे कृत्य म्हणजे या देशातील एक कर्तबगार अधिकारी, जे २६/११ च्या हल्ल्यात शहीद झाले, त्या हेमंत करकरे यांनी केलेल्या तपासावर अविश्वास दाखविण्याचा प्रकार असून, हा त्यांचा अपमान आहे. सरकारच्या दबावानेच हे कृत्य घडले असून, ते देशाच्या दृष्टीने घातक असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. (विशेष प्रतिनिधी)