शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

अजितदादांच्या घराबाहेर जादूटोणा अन् भोंदूबाबा कनेक्शन; १ महिन्यापूर्वी काय घडलं?, मिटकरींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 12:14 IST

अजित पवारांच्या विमानाचा अपघात की घातपात त्याचे उत्तर नाशिकच्या खरात प्रकरणात दडलेले असेल असा दावा अमोल मिटकरी यांनी केला.

अकोला - नाशिकच्या भोंदूबाबा प्रकरणानं राज्यात खळबळ उडाली आहे. महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या या भोंदूबाबाचे राजकीय कनेक्शन समोर आले आहेत. त्यानंतर आता अजित पवारांच्या विमान अपघाताशी याचे कनेक्शन आहे का असा थेट सवाल करत आमदार अमोल मिटकरी यांनी अनेक धक्कादायक दावे केले आहेत. दादांच्या विमान अपघाताच्या १ महिनापूर्वी अघोरी पूजेचा प्रकार त्यांच्या बंगल्याबाहेर करण्यात आला होता असं मिटकरींनी म्हटलं आहे.

आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं की, नाशिकच्या कॅप्टन खरातचे व्हीएसआर कंपनीशी संबंधित फोटो समोर आलेत. हा नराधम, भामटा बाबा होता. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ हाती लागतेल. राजकीय लोकांचा गॉडफादर, नेत्यांचा सल्लागार असलेला हा बाबा होता. त्याचे कृत्य जनतेसमोर आले आहे. २८ जानेवारीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात झाला. ज्या VSR कंपनीच्या विमानाचा अपघात झाला त्याच्याशी भोंदूबाबाचे कनेक्शन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. VSR कंपनीच्या नादुरुस्त विमानात बसण्याचा सल्ला कदाचित या भोंदूबाबाने दिला असावा हे नाकारता येत नाही. हा अध्यात्मातील नव्हे राजकीय बाबा होता. राजकारणात यश मिळण्यासाठी बळी घेण्याचा सल्ला दिला असेल. अजितदादा अघोरी प्रथांपासून दूर असायचे. पवार कुटुंबातील कुणीही यावर विश्वास ठेवत नाही. परंतु विमान अपघाताच्या १ महिन्यापूर्वी मुंबईतील देवगिरी, बारामतीतील सहयोग बंगल्याबाहेर अघोरी पूजेचा प्रकार आढळला होता असा आरोप त्यांनी केला. 

तसेच या पूजेत लिंबू पुजले होते, कुंकू हळद होते. कुणाच्या तरी सांगण्यावरून हा अघोरी प्रकार केला गेला होता का? आता व्हीएसआर विमानासोबत या बाबाचे फोटो पाहता त्याचे या कंपनीच्या मालकासोबत राजकीय कनेक्शन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणात एसआयटी असेल सीआयडी असेल त्यांनी या भोंदूबाबाचे २६ ते ३१ जानेवारीपर्यंतचे कॉल डिटेल्स काढावेत. हा कुणाच्या संपर्कात होता. अजित पवार बायरोड बारामतीला जाणार होते, परंतु त्यांना विमानाने जायला लावा असं या बाबाने कुणाला सांगितले का? व्ही.के सिंगला सांगून नादुरुस्त विमानाने अजित पवारांना जायला भाग पाडले का? अशी शंकाही मिटकरी यांनी उपस्थित केली. 

दरम्यान, विमानात इंधनाचा साठा होताच परंतु आणखी काही विषारी द्रव्ये भरले होते असं आम्हाला कळते. त्यामुळे जेव्हा हे विमान लँडिग होत होते तेव्हा हे विषारी द्रव्ये सोडले गेले असावे. त्यामुळे विमानातील पायलट, क्रू मेंबर्स आणि इतर प्रवासी बेशुद्ध पडले असावेत त्यानंतर विमानाचा अपघात होऊन त्याचा स्फोट झाला. ही शक्यताही नाकारता येत नाही. विषारी वायूचा प्रयोग केला गेला आहे का? VSR कंपनीवर एफआयआर घेतला नाही. त्या कंपनीच्या मालकाला अटक झाली नाही. त्यामुळे या अपघाताचे धागेदोरे नाशिकच्या आश्रमापर्यंत येऊन पोहचतात. या भोंदूबाबाचे कॉल डिटेल्स काढले पाहिजे. अजित पवारांच्या विमानाचा अपघात की घातपात त्याचे उत्तर नाशिकच्या खरात प्रकरणात दडलेले असेल असा दावा अमोल मिटकरी यांनी केला.

अधिवेशनात मुद्दा मांडणार

नाशिकचा बाबा कुणाच्या मर्जीतला होता, बाबाच्या मर्जीतल्या भक्तांची वेगळी डायरी असेल. हे भक्त कोण हे शोधले पाहिजे. बाबाच्या मर्जीतला व्यक्ती हा दादांच्या घातपात कटातील मुख्य आरोपी असू शकतो. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. हा विषय मी अधिवेशनात मांडणार आहे. या प्रकरणावर चर्चा होईल अशी माहिती मिटकरी यांनी दिली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's home targeted with black magic; Baba link alleged.

Web Summary : Amol Mitkari alleges black magic outside Ajit Pawar's home preceded a plane incident. He suspects a connection to a controversial Baba and a faulty VSR aircraft, demanding investigation into possible foul play and call records.
टॅग्स :Ashok Kharatअशोक खरातAjit Pawarअजित पवारAmol Mitkariअमोल मिटकरीPlane Crashविमान दुर्घटना