शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
2
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
3
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
4
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
5
महिला आरक्षण: सुप्रिया सुळेंनी CM फडणवीसांचे आव्हान स्वीकारले; म्हणाल्या, “वेळ-जागा सांगा”
6
गुरुपुष्यामृत योग २०२६: केवळ सोने खरेदीच नाही, तर आयुष्याला सोन्याची झळाळी देणारा 'गुरुपुष्य' योग!
7
नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
8
गाडी खरेदी करताना शोरूममधूनच इन्शुरन्स घेणे बंधनकारक आहे का? काय आहे नियम?
9
जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भीषण भूकंप! उत्तर किनारपट्टीला 'सुनामी'चा तडाखा बसण्याची शक्यता; ३ मीटर उंच लाटांचा इशारा
10
प्रार्थना आणि अश्रू..., हवेत ४ तास मृत्यूशी सामना! हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या Fly91 मध्ये तांत्रिक बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!
11
एअरटेल ग्राहकांना महागाईचा शॉक! ८४ दिवसांचा प्लॅन महागला, ७९९ चा प्लॅनही हटवला; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे
12
Bank Loan Rejection Reasons: पगार भक्कम असूनही बँक कर्ज नाकारतेय? 'या' ४ चुका ठरू शकतात कारणीभूत!
13
Sade Sati: साडेसातीचा विळखा की परिवर्तनाची संधी? मेष, कुंभ आणि मीन राशींसाठी आगामी काळ कसा असेल?
14
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
15
शेवटची इच्छा पूर्ण! 'स्वरस्वामिनी' आशा भोसले यांच्या अस्थींचे पवित्र गंगेत विसर्जन
16
इराण चर्चेसाठी पाकिस्तानात जाणार की नाही? इब्राहीम अजीजी म्हणाले, "प्रत्येक अट स्वीकारली जाणार नाही"
17
IPL 2026: रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? GT vs MI मॅचआधी आली महत्त्वाची अपडेट
18
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
19
पश्चिम बंगालमध्ये ७ लाख नवीन मतदारांची भर; आगामी निवडणुकीत राजकीय गणिते बदलणार?
20
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा मेहकरवर दावा

By admin | Updated: August 22, 2014 23:36 IST

राष्ट्रवादीचा होणारा सातत्यपूर्ण पराभवामुळे काँग्रेसने मेहकर मतदारसंघावर दावा केला आहे.

ब्रम्हानंद जाधव/मेहकरमेहकर विधानसभा मतदार संघ हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये पूर्वसूत्रानुसार राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेला आहे; परंतु या मतदारसंघात राष्ट्रवादीचा होणारा सातत्यपूर्ण पराभव व मेहकर न.प. आणि लोणार न.प. व पं.स.वर असलेली काँग्रेसची सत्ता लक्षात घेऊन काँग्रेसने या मतदार संघावर दावा केला आहे. जागा वाटपाच्या गणितामध्ये हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांमधून होत असून, येथील काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही आता आमदारकीचे ह्यडोहाळेह्ण लागले आहेत. तर दुसरीकडे वीस वर्षांपासून सत्ता गाजवत असलेला शिवसेना पक्ष यावेळीही जोमात असून, सलग पराभवाची सल बोचणारा राष्ट्रवादी पक्ष मात्र अस्वस्थ आहे.मेहकर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात असून; प्रतापगड म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे. वीस वर्षांपासून या मतदारसंघात शिवसेनेचाच भगवा फडकत असल्याने प्रत्येक विधानसभेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसची येथे घालमेल होत आहे. शिवसेना विरूद्ध काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अशा या लढतीत मनसे व भारिप-बमसं उतरणार असल्याने, चौरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सन १९९४ पूर्वी मेहकर मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आपसात असलेल्या मतभेदाने १९९४ पासून या मतदार संघाची राजकीय फळीच विस्कटली आहे. २0 वर्षांपासून या मतदारसंघात काँग्रेसची व १५ वर्षांपासून राष्ट्रवादीची विधानसभेची गणितं बदलत गेली आहेत. शिवसेनेचे वर्चस्व निर्माण झालेल्या या मतदारसंघात सेनेच्या यशामध्ये खा. प्रतापराव जाधव यांचा सिंहाचा वाटा आहे. या विधानसभेसाठी शिवसेनेकडून आ. डॉ. संजय रायमुलकर यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे दिगंबर डोंगरे व आरपीआय महायुतीचे मधुकरराव गवई यांच्यासह काही कार्यकर्ते मतदार संघातील गावं पिंजून काढत आहेत.