शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

काँग्रेस घेणार दुष्काळाचा आढावा; औरंगाबादमध्ये १३ तारखेला बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 1:13 AM

दुष्काळी परिस्थिती, राष्ट्रवादीसोबत जागावाटप आदी विषयांवर चर्चा करण्यासाठी गुरुवारी काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या वेळी आगामी जनसंघर्ष यात्रा आणि दुष्काळी दौरा एकत्रितपणे करण्याचा निर्णय झाला.

मुंबई : मराठवाडा आणि विदर्भासह राज्यातील विविध भागांत दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करणे गरजेचे आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या वतीने औरंगाबाद येथे १३ तारखेला बैठक घेणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. काँग्रेसच्या सर्व नेत्यांना बोलावून जिल्हानिहाय आढावा घेण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.दुष्काळी परिस्थिती, राष्ट्रवादीसोबत जागावाटप आदी विषयांवर चर्चा करण्यासाठी गुरुवारी काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या वेळी आगामी जनसंघर्ष यात्रा आणि दुष्काळी दौरा एकत्रितपणे करण्याचा निर्णय झाला. औरंगाबाद येथे १३ आॅक्टोबरला होणाऱ्या बैठकीत दुष्काळाचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात येईल. या बैठकीस विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रमुख नेते तर मराठवाड्यातील सर्व खासदार, आमदार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व इतर प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.जागावाटपावरून बैठक वादळीजागावाटपाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत चढाओढ सुरू आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या जागांवर दावा सांगण्यास सुरुवात केल्याने शुक्रवारी आघाडीबाबत होणारी बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. जागावाटपाबाबत विचारले असता, सध्या आमची पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रवादीसोबतही चर्चा करू. अद्याप दोन्ही पक्षांत जागावाटपाची चर्चा झाली नसल्याचे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस