शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

झोपलेल्या सरकारला काँग्रेस जागे करणार!

By admin | Updated: September 14, 2016 06:41 IST

राज्यातील सरकार हे टिष्ट्वटरवर चालणारे सरकार आहे़ टीव्ही कलावंताच्या टिष्ट्वटची दखल तत्काळ घेऊन कारवाई करण्यात येते, मात्र सामान्य माणूस आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात

नंदुरबार : राज्यातील सरकार हे टिष्ट्वटरवर चालणारे सरकार आहे़ टीव्ही कलावंताच्या टिष्ट्वटची दखल तत्काळ घेऊन कारवाई करण्यात येते, मात्र सामान्य माणूस आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात नाहीत़ हे सरकार झोपी गेले आहे़ त्याला जाग आली तर ठिक, अन्यथा काँग्रेस पक्ष सरकारला जागे करेल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिला़नंदुरबारमध्ये छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात मंगळवारी झालेल्या शेतकरी मेळाव्यात खा. चव्हाण म्हणाले, काँग्रेसची पाळेमुळे मजबूत करण्यात जिल्ह्यातील सर्वच नेत्यांचा सहभाग राहिला आहे़ धुळे व नंदुरबार जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे़ देशातील ‘आधार’सारख्या अनेक महत्त्वपूर्ण योजनांची सुरूवात नंदुरबार जिल्ह्यात करण्यात आली. नंदुरबारसह राज्यातील आदिवासी बांधवांच्या वनजमिनी उद्योगपतींच्या घशात घालण्याचा या सरकारचा डाव आहे़ त्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुढाकार घेत, आदिवासी बांधवांना न्याय देण्याच्या सूचना केल्या आहेत़ त्यानुसार अनुसूचित जमाती सेलचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे़ आदिवासींंना वनजमिनीतून उत्पन्न मिळून ती जमीन त्यांच्या मालकीची असावी, असा काँग्रेसचा आग्रह आहे़ त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे़ त्याला यश येईलच, असा आशावादही चव्हाण यांनी व्यक्त केला़ मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, माजी केंद्रीय मंत्री तुषार चौधरी, माणिकराव गावीत, आ. के.सी.पाडवी, अमरिशभाई पटेल, डी. एस.अहिरे, कुणाल पाटील, माजी मंत्री पद्माकर वळवी, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक आदी उपस्थित होते़