अखेर तो गावगुंड मोदी सापडलाच, पण...; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा खरा ठरला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 09:03 PM2022-01-21T21:03:18+5:302022-01-21T21:10:03+5:30

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. त्यात मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो असं म्हंटल्याचं दिसून आलं होतं.

Congress state president Nana Patole's claim came true Local Goon Modi Presence in PC, Target on BJP | अखेर तो गावगुंड मोदी सापडलाच, पण...; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा खरा ठरला

अखेर तो गावगुंड मोदी सापडलाच, पण...; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा खरा ठरला

Next

सुरभी शिरपूरकर

भंडारा- गोंदिया येथे निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चांगलेच अडचणीत आले होते. नाना पटोलेंच्या विधानानंतर राज्यभरात भाजपानं पटोलेंविरोधात आंदोलनं केले होते. मात्र आपण एका गाव गुंड मोदीविरोधात ते वक्तव्य केले होते असा पवित्रा नाना पटोलेंनी घेतला होता. मग हा गावगुंड कोण? अशी चर्चा सगळीकडे सुरु झाली.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(BJP Chandrakant Patil) यांनी गावगुंड मोदी दाखवावा असं आव्हान केले होते. त्यानंतर आता पटोलेंनी ज्या गावगुंड मोदीचा उल्लेख केला त्याबद्दल माहिती समोर आली आहे. राज्यभरात हे प्रकरण चांगलंच गाजत असताना नाना पटोलेंनी(Congress Nana Patole) आज नागपुरात त्यांचे वकील सतीश उके यांच्याकरवी आपला दावा खरा करुन दाखवण्यासाठी उमेश उर्फ मोदी प्रेमदास घडे याला प्रसारमाध्यमांसमोर हजर केलं.

कोण आहे गावगुंड मोदी?

उमेश उर्फ मोदी प्रेमदास घडे यांनीही दारुच्या नशेत मी नाना पटोले आणि काँग्रेसला मतदान करु नका असं बोललो होतो. यावेळी मी शिवीगाळ केल्याचंही उमेश घडे यांनी मान्य केलं. उमेश घडे याला मोदी या टोपण नावानं ओळखलं जातं. यावेळी पटोलेंचे वकील उके यांनी उमेश घडे यांनाच नाना पटोले मोदी उद्देशून बोलल्याचं सांगितलं.  

नेमकं काय घडलं?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. त्यात मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो असं म्हंटल्याचं दिसून आलं होतं. सोशल मीडियात ही क्लीप व्हायरल होताच भाजपा आक्रमक झाला. भाजपानं राज्यभरात आंदोलन करत नाना पटोले यांच्याविरोधात तक्रार नोंदवली. भंडारा-गोंदियात असा कोणता मोदी नावाचा गावगुंड आहे की नाही यासाठी प्रसारमाध्यमांनी शोधमोहीमही राबवली नाना पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबतच असा उल्लेख केल्याचा दावा भाजपाने केला. त्याचसोबत या प्रकरणानं राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस नेत्यांची नाचक्की झाली होती. अखेर नाना पटोलेंनी माध्यमांसमोर केलेला खुलासा खरा करुन दाखवल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.

Web Title: Congress state president Nana Patole's claim came true Local Goon Modi Presence in PC, Target on BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app