शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

“कमर्शिअलनंतर घरगुती गॅसचा नंबर लागेल, आता चूल पेटवावी लागते का?”; विरोधकांची सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 13:05 IST

Congress Criticizes Govt Over Gas Cylinder: या युद्धामुळे गॅसचा तुटवडा देशात आणि राज्यात पाहायला मिळत आहे.

Congress Criticizes Govt Over Gas Cylinder: इराणमध्ये नवीन सर्वोच्च नेत्याची निवड आणि सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतींनी गेल्या अनेक वर्षातील उच्चांक गाठला. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत रातोरात ३० टक्क्यांची प्रचंड वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात 'ब्रेंट क्रूड'ने प्रतिबॅरल १२० डॉलर्सचा टप्पा गाठल्याने संपूर्ण जगाचे धाबे दणाणले असून, जगभरातील शेअर बाजार कोसळले आहेत. या युद्धामुळे आखाती देशांतील तेल उत्पादन आणि वाहतूक धोक्यात आली असून, त्याचे थेट पडसाद भारतीय अर्थव्यवस्थेवरही पडून महागाई वाढण्याची भीती आहे. यातच राज्यातील काँग्रेस नेत्यांनी यावरून टीका केली आहे. 

हॉटेलमध्ये जेवणारे, कामगार गॅसवरती अवलंबून आहे. व्यवसाय करणाऱ्यांना मोठे नुकसान आहे. हजारो लोक काम करतात, उद्योग व्यवसाय असो किंवा घरात काय परिस्थिती होईल सांगता येत नाही. महागाईचा परिणाम १०० टक्के लोकांना जाणवणार आहे. पुढील ८-१० दिवसात मध्यमवर्गीयांना सहन करावे लागेल. सरकार सगळे व्यवस्थित चांगले आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली. 

कमर्शिअलनंतर घरगुती गॅसचा नंबर लागण्याची शक्यता

कमर्शिअल गॅसवर निर्बंध आणलेत. घरगुती गॅसचा नंबर लागण्याची शक्यता आहे. चूल पेटवावी लागते का? असा प्रश्न आहे. ऑइल कंपन्यांकडे कच्चा माल नाही तर उत्पादन कसे वाढवणार, एकूणच परराष्ट्र धोरण चुकीच्या पद्धतीचे परिणाम आहेत. ग्राऊंड परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे काय आहे. सभागृहात सरकारने आश्वासित करावे, गॅसचा तुटवडा होणार आहे, सभागृहात आम्ही हा प्रश्न मांडणार आहोत. सरकार माहिती घेत आहे, पुरवठा किती आहे काय आहे? जर तुडवडा नसेल तर अधिकाऱ्यांकडून माहिती का घेतली जात आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील २० टक्के हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुढील तीन दिवस असाच गॅसचा तुटवडा सुरू राहिल्यास मुंबईतील ५० टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता आहे. अमेरिका इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसचा तुटवडा देशात आणि राज्यात पाहायला मिळत आहे.  

 

English
हिंदी सारांश
Web Title : Gas shortage fears rise; Opposition criticizes government's handling of crisis.

Web Summary : Congress criticizes the government as commercial gas restrictions raise domestic concerns amid rising crude oil prices due to international conflict. Satej Patil warns of potential hardship for middle-class families and possible gas shortages, with some Mumbai hotels already closing due to scarcity.
टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलcongressकाँग्रेस