शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची २८८ जागा लढण्याची तयारी

By admin | Updated: August 14, 2014 01:49 IST

राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी धर्माला जागणार नसेल तर राज्यात विधानसभेच्या २८८ जागा लढण्याची काँग्रेसची तयारी आहे,

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी धर्माला जागणार नसेल तर राज्यात विधानसभेच्या २८८ जागा लढण्याची काँग्रेसची तयारी आहे, असा सज्जड इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्र्यांच्या बुधवारी येथे झालेल्या बैठकीत देण्यात आला. काँग्रेसच्या २८८ उमेदवारांची यादी आपल्याकडे तयार आहे, असे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख आणि काँग्रेसचे सर्व मंत्री हे टिळक भवनात झालेल्या या बैठकीला उपस्थित होते.कोणत्याही परिस्थितीत आम्हाला १४४ जागाच हव्यात असा दबाव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आणला जात आहे. ही मागणी मान्य असेल तर आम्हाला फोन करा असे त्यांचे बोलणे कुठल्या आघाडी धर्माला धरून आहे, असा खडा सवाल या बैठकीत करण्यात आला. विधान परिषद पोटनिवडणुकीतील जागा काँग्रेसच्या हक्काची असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काँग्रेसला विश्वासात न घेता अर्ज भरला. विदर्भात अलिकडे झालेल्या काही नगराध्यक्षांच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीने काँग्रेसला धोका दिला. विधान परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांची उमेदवारी कोणत्याही परिस्थितीत मागे घेऊ नका, असे ठाम मत व्यक्त करण्यात आले.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे बुधवारी रात्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतील तेव्हा त्यांनी तटकरेंची उमेदवारी मागे घेण्याचा मुद्दा जोरकसपणे रेटावा, असेही काँग्रेसच्या बैठकीत ठरले. शरद पवार यांनी बुधवारी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादीच्या निवडक नेत्यांची बैठक घेतली. त्यावेळी तटकरे यांची उमेदवारी कायम राहील, अशी भूमिका घेण्यात आली. (विशेष प्रतिनिधी)