“केवळ बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले गेले नाहीत”: पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 16:08 IST2025-02-01T16:08:31+5:302025-02-01T16:08:37+5:30

Congress Prithviraj Chavan Reaction on Union Budget 2025: चीनने एआयबाबत अमेरिकेला मागे टाकले आहे. यात आपण कुठे आहोत हा प्रश्न आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

congress prithviraj chavan reaction over union budget 2025 | “केवळ बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले गेले नाहीत”: पृथ्वीराज चव्हाण

“केवळ बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले गेले नाहीत”: पृथ्वीराज चव्हाण

Congress Prithviraj Chavan Reaction on Union Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांनी सुमारे १ तास १४ मिनिटे चाललेल्या अर्थसंकल्पी भाषणामध्ये, युवा, शेतकरी, महिला, सेवाक्षेत्र, रोजगार, कर्ज आणि विशेष पॅकेज यासंबंधीच्या महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. एनडीएकडून या अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात आले असले, तरी महाविकास आघाडीकडून या अर्थसंकल्पावर टीका करण्यात आली आहे. 

अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान अर्थमंत्र्यांनी सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये १२ लाख रुपयांपर्यंतच्या कमाईवर कोणताही कर लागणार नसल्याची घोषणा करण्यात आली. नवीन इन्कम टॅक्स विधेयक पुढील आठवड्यात आणण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. इनडायरेक्ट टॅक्स रिफॉर्म्सबाबत पुढील आठवड्यात सांगण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली. 

केवळ बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेला अर्थसंकल्प

केवळ बिहार निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काही घोषणा यांनी केल्या आहेत. महागाईवर काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत. देशाचा आर्थिक विकासदर मंदावत आहे. सरकारने ते मान्य केले आहे. २०४७ पर्यंत भारत विकसित होणार हे दिवा स्वप्न दाखवत आहात का, ते याबाबत नेमकेपणाने सांगत नाही. दरडोई उत्पन्नात आपण १४७ क्रमांकावर आहोत. लोकांचे सरासरी वार्षिक उत्पन्न वाढवण गरजेचे होते मात्र तसे दिसत नाही, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. तसेच शेतकऱ्यांचे अश्रू पुसतील अशी अपेक्षा होती, परंतु असे काहीच केले नाही. शिक्षण क्षेत्रात काहीच केले नाही. अर्थमंत्र्यानी कृषी विभागाचे कौतुक केले. परंतु त्यांची प्रमुख मागणी म्हणजे हमी भाव मिळण्याचा कायदा, याबाबत काहीच केले नाही. आताही राज्यात दररोज ७ शेतकरी आत्महत्या करतात. खर्चापेक्षा कमी उत्पन मिळाले तर शेतकरी आत्महत्या रोखणार कसे, अशी विचारणा चव्हाण यांनी केली. १० लाख कोटी गुंतवणूक होणार अशी घोषणा केली. मात्र ते अस्तित्वात येईल असे वाटत नाही, असा दावा चव्हाण यांनी केला. 

दरम्यान, चीनने एआयबाबत अमेरिकेला मागे टाकले आहे. यात आपण कुठे आहोत हा प्रश्न आहे. २३ आयआयटी सुरू करण्यात आले आहे. परंतु आता तिथल्या दर्जा खालावण्याची परिस्थिती आहे. कारण तिथ शिकवण्यासाठी स्टाफ नाही. विमा क्षेत्रात १०० टक्के परकीय गुंतवणूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आता परदेशी कंपन्या भारतात येतील. परदेशी विमा कंपन्या भारतात येतील. मात्र इथल्या विमा कंपन्यांना भक्कम करण गरजेचे आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 
 

Web Title: congress prithviraj chavan reaction over union budget 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.