शरद पवारांना 'मविआ'कडून उमेदवारी देण्यास काँग्रेसचा स्पष्ट विरोध, 'या' नेत्याचं सुचवलं नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 22:32 IST2026-02-27T22:29:55+5:302026-02-27T22:32:25+5:30
Sharad Pawar Rajya Sabha Congress: विधान परिषदेसाठी पसंती कुणाला तेही सांगितलं

शरद पवारांना 'मविआ'कडून उमेदवारी देण्यास काँग्रेसचा स्पष्ट विरोध, 'या' नेत्याचं सुचवलं नाव
Sharad Pawar Rajya Sabha Congress: राज्यात आगामी काळात राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होणार आहे. या सात पैकी केवळ एकच जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येऊ शकतो, असे समीकरण तयार झाले आहे. अशा परिस्थितीत या एका जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू आहे. महाराष्ट्रातून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यात यावे, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वारंवार व्यक्त केले आहे. पण त्यावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. यासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार)च्या नेत्यांची बैठक पार पडली. मात्र या बैठकीतूनही तोडगा निघाला नाही. तशातच उद्धवसेनेने वरुण सरदेसाई यांनी, काही झाले तरी राज्यसभेच्या जागेवरील दावा सोडणार नसल्याचे म्हटले आहे. त्यातच भर म्हणून आता काँग्रेसनेही शरद पवारांच्या नावाला विरोध करत दुसरे नाव पुढे केले आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा
शरद पवारांच्या जागी कुणाचं नाव?
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (mallikarjun kharge) हे राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते आहेत. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस पक्षाची भूमिका पाहता राज्यसभा निवडणूक काँग्रेस पक्षाने लढवावी, असे स्पष्ट मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले आहे. दुसरीकडे, मविआचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेची निवडणूक मविआकडून लढवावी, असेही मत हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडले आहे.
वरूण सरदेसाई काय म्हणाले?
महाविकास आघाडीत सर्वात जास्त आमदार उद्धवसेनेचे आहेत. त्यामुळे ही जागा आम्हाला मिळावी, असा आग्रह उद्धवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत याबाबत एकमत झालेले नाही. त्यामुळे ही जागा कोणाला सुटणार याकडे लक्ष लागले आहे. यानंतर आता उद्धवसेनेचे आमदार वरूण सरदेसाई यांनीही प्रतिक्रिया देताना राज्यसभेच्या जागेवरील दावा सोडणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.