शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

“मोदी सरकार सत्तेत आल्यापासून रेल्वे अपघातात वाढ”; जळगाव दुर्घटनेवरून काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 21:02 IST

Congress Nana Patole Reaction On Jalgaon Railway Accident: जळगाव रेल्वे अपघातावरून विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

Congress Nana Patole Reaction On Jalgaon Railway Accident: पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. त्याचवेळी समोरुन कर्नाटक एक्सप्रेस आली. या ट्रेनखाली येऊन जवळपास १२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. ही भीषण घटना पाचोरा ते परधाडे दरम्यान घडली. यात ४० हून अधिक प्रवासी जखमी झाले असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावरून आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली असून, काँग्रेसने या प्रकरणी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 

माहिजी-परधाडे स्थानक येण्यापूर्वी एका बोगीत चैन ओढली गेली. त्यानंतर वेगात असलेल्या रेल्वेगाडीने अचानक ब्रेक दाबायला सुरुवात केली. त्यामुळे रेल्वेरुळांवर ठिणग्या उडत गेल्या. परधाडे स्टेशनवर रेल्वेगाडी थांबली. तेव्हा एका बोगीतील प्रवाशांना या ठिणग्या दिसल्यावर बोगीत आग लागली असावी, या शक्यतेने ५० ते ६० जण समोरच्या रुळावर धावले. तशातच समोरुन वेगात कर्नाटक एक्स्प्रेस आली. त्यावेळी रुळावरच्या प्रवाशांची धावाधाव सुरु केली असतानाच काही जण रेल्वेखाली चिरडले गेले, असे म्हटले जात आहे. 

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून रेल्वे अपघातात वाढ

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून रेल्वे अपघातात वाढ झालेली आहे. यात निर्दोष लोकांचा जीव जात आहे. पंतप्रधान मोदी यांचे सरकार योजना आणण्याच्या घोषणा करतात. कोणाचा जीव जाणार नाही, असे दावे करतात. कवच नावाची योजना आणणार असल्याचेही सांगितले जाते. परंतु, त्याचा किती उपयोग होत आहे, हे स्पष्ट आहे. कवच योजना ही जुमलेबाजी आहे. उलट आमच्या सरकारच्या कार्यकाळात रेल्वेची तिकिटे स्वस्त होती. आता मोदी सरकारच्या कार्यकाळात तिकीट दर तर वाढवण्यात आले आहेतच. पण लोकांचा जीवही जात आहे. हे प्रकार अजून किती होत राहणार, असा सवाल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला. 

दरम्यान, रेल्वे अपघातांवर केंद्र सरकारचे नियंत्रण नाही. केंद्र सरकार त्यांच्या मित्रांची मालगाडी अधिकाधिक कशी धावेल, हे पाहत आहे. मित्रांचा फायदा कसा होईल, हे पाहत आहे. सामान्य प्रवाशांसाठी असलेल्या प्रवासी रेल्वेचा अशा प्रकारे अपघात होणे दुर्दैवी आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :JalgaonजळगावNana Patoleनाना पटोलेNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारIndian Railwayभारतीय रेल्वेcentral railwayमध्य रेल्वे