congress leader yashomati thakur asked why bjp leaders keep their mouth shut on hathras rape case | हाथरस प्रकरणावेळी भाजपचे नेते गप्प का होते; यशोमती ठाकूर यांचा थेट सवाल

हाथरस प्रकरणावेळी भाजपचे नेते गप्प का होते; यशोमती ठाकूर यांचा थेट सवाल

ठळक मुद्देयशोमती ठाकूर यांचा भाजपवर पलटवारजळगाव प्रकरणात स्वतः लक्ष घालणार असल्याचे आश्वासनगृह विभागासह महिला आणि बालकल्याण विभागही चौकशी करेल - यशोमती ठाकूर

मुंबई : जळगावातील महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याच मुद्द्यावर भाजपने (BJP) विधानसभेत आक्रमक ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी भाजपवर हल्लाबोल केला असून, हाथरस प्रकरणावेळी भाजपचे नेते गप्प का होते, अशी विचारणा त्यांनी केली आहे. (congress leader yashomati thakur asked why bjp leaders keep their mouth shut on hathras rape case)

जळगाव प्रकरणी गृहमंत्री यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, आपण स्वतः या प्रकरणात लक्ष घालणार आहे. गृह विभागाकडूनही चौकशी होईल. परंतु, महिला बालकल्याण विभागही चौकशी करेल, असे आश्वासन देत यशोमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, ही घटना निंदनीय आहे आणि याचे राजकारण केले जाते आहे. महिला ही महिला असते, ती काही कोणत्या पक्षाची नसते. पण उतर प्रदेशच्या हाथरस येथे असे प्रकरण घडले तेव्हा भाजप नेते गप्प होते, अशी विचारणा यशोमती ठाकूर यांनी केली आहे. 

भाजपची आक्रमक भूमिका

जळगाव प्रकरणाचे विधानसभेत जोरदार पडसाद उमटले. आमच्या आयाबहिणींची थट्टा केली जात असेल तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे हाच एक मार्ग आहे. या सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे, असा इशारा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

मविआ सरकारमध्ये संवेदना नाही, सरकारला सत्तेचा माज आणि मस्ती: प्रविण दरेकर 

नेमके प्रकरण काय आहे?

जळगावातील महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही पोलीस कर्मचारी आणि वसतिगृहाबाहेरील पुरुष मंडळी या कृत्यात सहभागी असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सामाजिक संघटनांनी या प्रकरणाला वाचा फोडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. महिला आणि बालकल्याण विभागामार्फत गणेश कॉलनीतील वसतिगृहात निराधार आणि अन्याय, अत्याचार झालेल्या महिला आणि मुलींच्या निवारा तसेच भोजनाची व्यवस्था केली जाते. या वसतिगृहात गैरप्रकार घडत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही आल्या होत्या, असे सांगितले जात आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: congress leader yashomati thakur asked why bjp leaders keep their mouth shut on hathras rape case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.