देशभरातून नरेंद्र मोदीची हवा संपली, आता काँग्रेसला अनुकुल वातावरण: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 04:58 PM2021-02-26T16:58:30+5:302021-02-26T17:00:21+5:30

गेल्या काही दिवसांपासून केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आणि भाजपवर काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सातत्याने टीका करताना दिसत आहेत. पेट्रोल-डिझेलची दरवाढ, गॅसच्या वाढत्या किमतींवरून नाना पटोले केंद्र सरकावर निशाणा साधत आहेत. काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जाऊन काँग्रेसचा विचार पोहोचवण्यासाठी नाना पटोले प्रयत्नात असून, देशभरातून नरेंद्र मोदीची हवा संपली, आता काँग्रेसला अनुकुल वातावरण आहे, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे.

congress leader nana patole says wave of pm narendra modi is subsidence | देशभरातून नरेंद्र मोदीची हवा संपली, आता काँग्रेसला अनुकुल वातावरण: नाना पटोले

देशभरातून नरेंद्र मोदीची हवा संपली, आता काँग्रेसला अनुकुल वातावरण: नाना पटोले

Next
ठळक मुद्देमहाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय - नाना पटोलेबुथ कमिट्या अधिक सक्षम करा - नाना पटोलेंचे आवाहनयवतमाळ व चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक पडली पार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आणि भाजपवर काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सातत्याने टीका करताना दिसत आहेत. पेट्रोल-डिझेलची दरवाढ, गॅसच्या वाढत्या किमतींवरून नाना पटोले केंद्र सरकावर निशाणा साधत आहेत. काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जाऊन काँग्रेसचा विचार पोहोचवण्यासाठी नाना पटोले प्रयत्नात असून, देशभरातून नरेंद्र मोदीची हवा संपली, आता काँग्रेसला अनुकुल वातावरण आहे, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. (congress leader nana patole says wave of pm narendra modi is subsidence)

काँग्रेस पक्ष हा सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन त्यांच्या विकासासाठी कट्टीबद्ध असलेला पक्ष आहे. काँग्रेसचा विचारच देशाला तारणारा आहे. देशभरातून नरेंद्र मोदीची हवा आता संपली असून, काँग्रेसला अनुकुल वातावरण आहे. नागपूरचा ५५ वर्षांचा भाजपाचा बालेकिल्लाही विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने खेचून आणला आहे. पुण्याची जागाही काँग्रेसने जिंकली. ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही काँग्रेसला राज्यात चांगले यश मिळाले आहे. लोकांचा हा विश्वास कायम ठेवून जोमाने काम केल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग अधिक सोपा होईल, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावाच लागेल; भाजप अधिक आक्रमक

महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून अनेक कल्याणकारी योजना राबिवण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना राबिवली. अवकाळीचे नुकसान होताच १० हजार कोटी रुपयांची मदत दिली. मागील भाजपा सरकारपेक्षा जास्त मदत अवघ्या एका वर्षात केली आहे. सरकारने केलेल्या कामाची, विविध योजनांची माहिती गावा-गावात पोहोचवण्याचे काम करा, असे आवाहन नाना पटोले यांनी केले. 

बुथ कमिट्या अधिक सक्षम करा

काँग्रेस पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जावून काँग्रेसचा विचार पोहचवला पाहिजे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेऊन कामाला लागा. बुथ कमिट्या अधिक सक्षम करा, समोर कितीही ताकदीचा उमेदवार असली तरी विजय निश्चित आहे, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

पेट्रोल-डिझेल दरवाढ: ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; जनतेला मिळणार दिलासा

दरम्यान, यवतमाळ व चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक मुंबई काँग्रेसचे कार्यालय राजीव गांधी भवन येथे पार पडली. या बैठकीला प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, नसीम खान, आ. कुणाल पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, मोहन जोशी, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, माजी मंत्री वसंत पुरके, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ,  आ. वजाहत मिर्झा, आ. प्रतिभा धानोरकर, प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, डॉ. संजय लाखे पाटील, देवानंद पवार आदी उपस्थित होते.

Web Title: congress leader nana patole says wave of pm narendra modi is subsidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.