काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; बैठकीत काय ठरले? सुप्रिया सुळेंनी दिली मोठी अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 17:02 IST2025-11-19T17:02:48+5:302025-11-19T17:02:48+5:30
NCP SP Group MP Supriya Sule News: एका आठवड्यात पूर्ण चित्र स्पष्ट होईल, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; बैठकीत काय ठरले? सुप्रिया सुळेंनी दिली मोठी अपडेट
NCP SP Group MP Supriya Sule News: आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मुंबईच्या हितासाठी जे योग्य असेल तसेच संविधानाच्या चौकटीत असेल, त्या भूमिकेला आमची नेहमीच साथ असेल आणि पुढेही राहील, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
लोकसंख्या वाढ, वाहतुकीतील गोंधळ, ड्रग्जचे प्रकरण, तरुणांचे वाढते व्यसनाधीनता आणि प्रशासनातील समन्वयाचा अभाव यामुळे पुण्यात गुन्हेगारीचा ग्राफ वाढत आहे. शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. पोलिसांवर प्रचंड ताण आहे. गुन्हे रोखण्यासाठी अधिक व्यवस्थात्मक पावले उचलली पाहिजेत, अशा शब्दांत त्यांनी शासनाला सूचना केल्या. याचबरोबर पीपीपी मॉडेलऐवजी सीएसआर निधीतून रुग्णालये चालवण्याचा पर्याय अधिक उपयोगी ठरेल, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; बैठकीत काय ठरले?
काँग्रेसचे शिष्टमंडळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी आले होते. यावेळी महाराष्ट्र आणि मुंबईतील अनेक प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली. पुढच्या आठवड्यात सविस्तर आम्ही बसून चर्चा करणार आहोत. बारकाईने चर्चा झाली नाही. काँग्रेस सोबत सहकार्याची भूमिका आम्ही कायम राहिली आहे. ती पुढेही राहील. एका आठवड्यात पूर्ण चित्र स्पष्ट होईल. आम्ही महाराष्ट्र आणि मुंबईच्या हितासाठी जी भूमिका असेल त्यासोबत आम्ही कायम राहू, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, ड्रग्स विरोधातील मोहिमेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. ड्रग्स प्रकरणात माझ्या भावना आई आणि नागरिक, लोकप्रतिनिधी म्हणून मी मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले होते. त्यांनी मला का स्पष्टीकरण दिले आहे, हे मला माहिती नाही. मीडियात जे दाखवले त्यावरून मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले आहे. आमच्या तुमच्या पक्षाचा असेल त्याच्या बदल सहनशीलता दाखवता कामा नये. खरेतर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी पत्र लिहायला हवे होते. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.