शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
6
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
7
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
8
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
9
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
10
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
11
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
12
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
13
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
14
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
15
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
16
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
17
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
18
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
19
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
20
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “ED हे मोदी सरकारच्या हातचे हत्यार, विरोधकांना टार्गेट करण्यासाठीच गैरवापर”; काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 14:09 IST

Maharashtra Politics: ‘भारत जोडो यात्रा’ गंगा नदीसारखी मुख्य धारा असून, उपनद्यांप्रमाणे इतर राज्यातही ही पदयात्रा सुरु असल्याचे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: भारत जोडो यात्रा’ (Bharat Jodo Yatra) कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास करत आहे. या मार्गाबद्दलही काही शंका व्यक्त केल्या जात आहेत पण देशाची दोन ध्रुव जोडणारा हा मार्ग आहे. ही पदयात्रा गंगा नदीसारखी मुख्य यात्रा असून उपनद्यांप्रमाणे ओडीशा, त्रिपुरा राज्यात पदयात्रा सुरु आहेत. पश्चिम बंगाल व इतर राज्यातही अशाच पद्धतीने ‘भारत जोडो यात्रा’ निघत आहेत, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी स्पष्ट केले आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना जयराम रमेश म्हणाले की, भारत जोडो यात्रा गुजरात, हिमाचल प्रदेश या निवडणुकीच्या राज्यातून जात नाही. महाराष्ट्रातही फक्त पाचच जिल्ह्यातून पदयात्रा जात आहे, इतर राज्यात तसेच भागात ही पदयात्रा का जात नाही? असे प्रश्न विचारले जात आहेत. पण कन्याकुमारी ते काश्मीर ही भारताची उत्तर-दक्षिण दोन धृव याने जोडले जात आहेत. निवडणुकीचे वेळापत्रक व पदयात्रेचे वेळापत्रक यांचा ताळमेळ लागणेही अशक्य आहे. निवडणुक काळात पदयात्रा गुजरात किंवा हिमाचल प्रदेशात गेली तर सर्व संघटना पदयात्रेतच व्यस्त राहिली असती. पदयात्रेचा मार्ग विविध क्षेत्रातील तज्ञांशी चर्चा करुन आखला गेलेला आहे, सुरक्षेसंदर्भातही काही प्रश्नांचा विचार करुन हा मार्ग निवडलेला आहे, असे त्यांनी सांगितले. 

विरोधी पक्षांचा छळ करण्यासाठी ईडी, सीबीआयचा गैरवापर

केंद्र सरकार ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर केवळ विरोधी पक्षातील लोकांवर दहशत निर्माण करण्यासाठी, त्यांचा छळ करण्यासाठी केला जात आहे. केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही त्याचीच किंमत मोजली आहे. सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी यांनाही चौकशीच्या नावाखाली नाहक त्रास दिला गेला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यावर याच पद्धतीने दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. विरोधी पक्षांनी वारंवार केंद्रीय यंत्रणांचा राजकीय स्वार्थासाठी गैरवापर केला जात असल्याबद्दल आवाज उठवला आहे. संजय राऊत यांना जामीन मंजूर करताना पीएमएलए कोर्टाने ईडीच्या कार्यपद्धतीवर गंभीर ताशेरे ओढले आहेत. ‘मोदी सरकार के दो भाई, ईडी और सीबीआय’, असा टोलाही जयराम रमेश यांनी लगावला.

दरम्यान, महाराष्ट्रात सहकार क्षेत्राच्या माध्यमातून विकासाची कामे झालेली आहेत. या क्षेत्रावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा दबादबा आहे. हा दबदबा मोडून काढण्यासाठीच भारतीय जनता पक्षाने केंद्रात सहकार खाते निर्माण करून गृहमंत्र्यांकडेच त्याचा कारभार सोपवला आहे. सहकार क्षेत्र मोडीत काढण्यासाठीच हे केले गेले आहे. डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या काळात सहकार क्षेत्रावर कर लावला जात नव्हता परंतु मोदी सरकारने सहकारावरही कर लावला आहे. साखर निर्यातीची मर्यादाही कमी केली आहे. हे सर्व सहकार क्षेत्र संपवण्यासाठी चालले आहे, असेही जयराम रमेश म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयSanjay Rautसंजय राऊत