“LPG दरवाढ तात्काळ रद्द करा, केंद्राने संसदेत गॅस संदर्भातील धोरण जाहीर करावे”: हर्षवर्धन सपकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 16:37 IST2026-03-13T16:35:53+5:302026-03-13T16:37:41+5:30

Congress Harshwardhan Sapkal: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गॅस वितरकाच्या कार्यालयात जाऊन वस्तुस्थिती जाणून घेतली.

congress harshwardhan sapkal said cancel lpg price hike immediately centre should announce gas policy in parliament | “LPG दरवाढ तात्काळ रद्द करा, केंद्राने संसदेत गॅस संदर्भातील धोरण जाहीर करावे”: हर्षवर्धन सपकाळ

“LPG दरवाढ तात्काळ रद्द करा, केंद्राने संसदेत गॅस संदर्भातील धोरण जाहीर करावे”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal: एलपीजी गॅस ६० रुपयांनी महाग करून भाजपा सरकारने सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खोल दरीत लोटले आहे. केंद्रातील भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ही दरवाढ झालेली आहे. युद्धाचे कारण पुढे करून जनतेची लूट करण्याऐवजी सरकारने ही दरवाढ तात्काळ रद्द करावी तसेच एलपीजी गॅस संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व घटकांशी चर्चा करून संसदेत निवेदन करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

गॅस दरवाढ व टंचाई विरोधात काँग्रेस पक्षाने राज्यभर आंदोलन करून भाजपा सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. देशातून गॅस सिलेंडर गायब आहे तर संसदेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी गायब आहेत. नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्पसमोर सरेंडर झाले आहेत, त्याची मोठी किंमत सामान्य माणसाला मोजावी लागत आहे. घरातून गॅस गायब आहे तर व्यासायीक सिलेंडर मिळत नसल्याने छोटे व्यवसाय, हॉटेल्स, खाणावळी बंद कराव्या लागत आहेत. राज्यातील भाजपा महायुती सरकार लाडक्या बहिणींना १५०० रुपये दिल्याचा ढोल पिटत असते पण दुसरीकडे मात्र महागाई करून या लाडक्या बहिणींची लुट करत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

गॅस दरवाढीवर महिला संतप्त

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी गॅस वितरकाच्या कार्यालयात जाऊन वस्तुस्थिती जाणून घेतली तसेच गॅस सिलेंडर घेण्यासाठी आलेल्या महिलांशी संवाद साधून गॅस टंचाईबद्दल त्यांच्या भावना काय आहेत हे जाणून घेतले. गॅस दरवाढीवर महिला संतप्त असून भाजपा सरकारने जगणे महाग केले आहे, अशा भावना महिलांनी बोलून दाखवल्या. 

दरम्यान, नागपूर, पुणे, ठाणे, वर्धा, बुलढाणा, गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा, पालघर, भिवंडी, कल्याण डोंबिवली, धाराशिव, चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, ठाणे, पनवेल सह सर्व जिल्ह्यात गॅस दरवाढ व टंचाईविरोधात आंदोलन करण्यात आले.

 

Web Title : एलपीजी मूल्य वृद्धि तुरंत रद्द करें, गैस नीति घोषित करें: सपकाल।

Web Summary : कांग्रेस ने एलपीजी मूल्य वृद्धि को तुरंत वापस लेने की मांग की, आम नागरिकों के लिए कठिनाई का हवाला दिया। सपकाल ने मोदी से संसद में इस मुद्दे को संबोधित करने का आग्रह किया। गैस की कमी और बढ़ती कीमतों के खिलाफ राज्यव्यापी विरोध प्रदर्शन हुए, महिलाओं ने जीवन यापन की लागत में वृद्धि पर गुस्सा व्यक्त किया।

Web Title : Revoke LPG price hike immediately, declare gas policy: Sapkal.

Web Summary : Congress demands immediate rollback of LPG price hike, citing hardship for common citizens. Sapkal urges Modi to address the issue in Parliament. Protests erupted statewide against gas scarcity and rising prices, with women expressing anger over the increased cost of living.