शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नगरसेवकांचा राडा

By admin | Updated: May 16, 2015 03:15 IST

महापालिका मुख्यालयातच काँग्रेसचे नगरसेवक राजन किणे आणि माजी गटनेते विक्रांत चव्हाण हे दोघे आपसात भिडल्याने भाजपापाठोपाठ

ठाणे : महापालिका मुख्यालयातच काँग्रेसचे नगरसेवक राजन किणे आणि माजी गटनेते विक्रांत चव्हाण हे दोघे आपसात भिडल्याने भाजपापाठोपाठ काँग्रेसमधील असंस्कृतीचे दर्शन ठाणेकरांना शुक्रवारी झाले. क्षुल्लक कारणावरून झालेल्या दोघांच्या बाचाबाचीचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्या वेळी दोघांचेही समर्थक एकमेकांसमोर आल्यावर मध्यस्थीसाठी महापौर संजय मोरे पुढे सरसावले होते. ठाणे महानगरपालिका प्रशासकीय आणि राजकीय अनागोंदी कारभारामुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे. शुक्रवारी महापालिकेत सर्वसाधारण सभा होती. याचदरम्यान झालेल्या भोजनाच्या सुटीमध्ये सभागृहातून बाहेर आलेल्या किणे यांना चव्हाण यांनी एकेरी आवाज दिला. त्या वेळी किणे यांनीही त्यांना वर्णावरून आवाज दिला. त्यावरून या दोघांमध्ये बाचाबाची झाली. या दोघांनी एकमेकांना लाथाही मारल्या. या वेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी त्यांचे भांडण सोडविले. तसेच, किणे यांना घेऊन ते सभागृहामध्ये गेले. त्यानंतर, हे दोघेही शांत झाले. मात्र, त्यानंतर चव्हाण आपल्या प्रभागात गेले आणि आपल्या काही समर्थकांना घेऊन आले. किणे खाली येण्याची वाट ते पाहत होते. किणे आणि त्यांचे समर्थक समोर दिसताच दोन्ही गटांत हाणामारी झाली. या वेळी महापौर मोरे यांच्यासह बहुतेक लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी केली. किणे यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.