शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा मोठा दणका! भाजपला मदत केल्याप्रकरणी जालना महानगरपालिकेतील ७ नगरसेवकांचे निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 16:44 IST

Jalna Congress: उघडपणे पक्षशिस्तीचा भंग केल्याने झाली कारवाई

Jalna Congress: जालना महानगरपालिकेतील ७ नगरसेवकांना काँग्रेस पक्षाने निलंबित केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार हि कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन गणेश पाटील यांनी दिली. महानगरपालिकेत स्विकृत सदस्य नियुक्ती करतेवेळी काँग्रेस नगरसेवक फरुक सादिक तुंडीवाले, इम्रान खान आमानुल्ला खान, फरहाना अ. रऊफ अंसारी, सुनिल अशोक बोरडे, मयुरी दिनेश देने, रुबिना मजिद पठाण, अनिल अशोक तिरुखे या ७ नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षाला उघडपणे मदत करून पक्षशिस्तीचा भंग केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

जालना महानगरपालिकेच्या राजकारणात आज एक मोठी खळबळ उडाली. महापालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीवेळी भारतीय जनता पक्षाला उघडपणे मदत करून पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत, काँग्रेस पक्षाने आपल्या सात नगरसेवकांना तडकाफडकी निलंबित केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

नेमके प्रकरण काय?

जालना महानगरपालिकेत स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेदरम्यान काँग्रेसच्या सात नगरसेवकांनी पक्षाच्या धोरणांविरुद्ध जाऊन भाजपच्या उमेदवारांना मदत केल्याचे समोर आले होते. या गंभीर प्रकरणाची पक्षांतर्गत चौकशी करण्यात आली. चौकशी अहवालात या सदस्यांनी जाणीवपूर्वक पक्षशिस्तीचा भंग केल्याचे स्पष्ट झाल्याने, प्रदेशाध्यक्षांनी कठोर पाऊल उचलत या सातही जणांना पुढील आदेशापर्यंत पक्षातून निलंबित केले आहे.

निलंबित करण्यात आलेल्या सदस्यांची नावे:

१. फारुक सादीक तुंडीवाले (गटनेते)२. इम्रान खान आमानुलला खान३. फरहाना अ. रऊफ अंसारी४. सुनिल अशोक बोरडे५. मयूरी दिनेश देणे६. रुबीना मजीद पठाण७. अनिल अशोक तिरुखे

राजकीय वर्तुळात चर्चा

या कारवाईचे पत्र प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आले आहे. तसेच याची प्रत जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांना माहितीसाठी पाठवण्यात आली आहे. एकाच वेळी सात नगरसेवकांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळल्याने जालना काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress Suspends Seven Corporators in Jalna for Aiding BJP

Web Summary : Jalna Congress suspends seven corporators for helping BJP during a municipal corporation election. The action, ordered by Harshvardhan Sapkal, follows an inquiry that confirmed violation of party discipline. The suspended corporators include Faruk Tundiwale and others, causing political turmoil.
टॅग्स :JalanaजालनाJalana Muncipalityजालना नगरपरिषदcongressकाँग्रेस