“वीज बील कमी करायच्या आश्वासनाला हरताळ, दिवाळीला वीज दरवाढीचा शॉक”; काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 19:08 IST2025-10-06T19:08:26+5:302025-10-06T19:08:26+5:30

या दरवाढीमुळे १०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकालाही या दरवाढीचा फटका बसणार आहे. 

congress atul londhe criticized promise to reduce electricity bills failed shock of electricity price hike on diwali | “वीज बील कमी करायच्या आश्वासनाला हरताळ, दिवाळीला वीज दरवाढीचा शॉक”; काँग्रेसची टीका

“वीज बील कमी करायच्या आश्वासनाला हरताळ, दिवाळीला वीज दरवाढीचा शॉक”; काँग्रेसची टीका

राज्यातील जनतेचे वीज बील पुढील पाच वर्षात कमी कमी केले जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीरपणे सांगितले होते पण मुख्यमंत्री यांनी आपल्याच शब्दाला बगल देत वीज बील महाग केले आहे. दिवाळीच्या तोंडावर केलेली ही वीज दरवाढ सर्वसामान्यांवर टाकलेला बोझा आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

वीज दर स्वस्त करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन हा जुमला ठरला असून इंधन समायोजनाच्या नावाखाली भाजपा महायुती सरकारने जनतेला वीज महागाईचा शॉक दिला आहे. या दरवाढीमुळे १०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकालाही या दरवाढीचा फटका बसणार आहे. 

मोदी सरकारने गब्बर सिंग टॅक्स लादून ८ वर्ष लूट केली व दुसरीकडे जीएसटी कमी केल्याचा आव आणत बचत उत्सव साजरा करण्याचा ढोल पिटता आणि जनतेच्या डोक्यावर सणासुदीच्या काळातच महागाईचे ओझेही टाकता हा कसला बचत उत्सव, असा प्रश्नही अतुल लोंढे यांनी विचारला आहे.

 

Web Title : कांग्रेस ने बिजली दर में वृद्धि की आलोचना की, फडणवीस का वादा झूठा बताया।

Web Summary : कांग्रेस ने दिवाली से पहले बिजली की दर में वृद्धि की आलोचना करते हुए इसे आम आदमी पर बोझ बताया। उन्होंने फडणवीस पर दरें कम करने के अपने वादे को तोड़ने का आरोप लगाया, इसे झूठा वादा करार दिया और बढ़ती कीमतों के बीच सरकार के बचत दावों पर सवाल उठाया।

Web Title : Congress slams power rate hike, calls Fadnavis promise a lie.

Web Summary : Congress criticizes the electricity rate hike before Diwali, calling it a burden on the common man. They accuse Fadnavis of breaking his promise to lower rates, labeling it a false promise and questioning the government's savings claims amidst rising prices.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.