Maharashtra Govemrnent: भाजपा खासदार म्हणे; 'गोडसे भक्त उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाच्या शुभेच्छा'  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 09:41 IST2019-11-29T09:25:28+5:302019-11-29T09:41:56+5:30

भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता.

congratulations to godse bhakt uddhav thackeray on taking over as cm of maharashtra says gvl narasimha rao | Maharashtra Govemrnent: भाजपा खासदार म्हणे; 'गोडसे भक्त उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाच्या शुभेच्छा'  

Maharashtra Govemrnent: भाजपा खासदार म्हणे; 'गोडसे भक्त उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाच्या शुभेच्छा'  

नवी दिल्लीः भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे लोकसभेत गदारोळ उडाला होता. त्याच पार्श्वभूमीवर प्रज्ञा सिंह ठाकूरना संरक्षण मंत्रालयाच्या समितीच्या सल्लागार पदावरून काढून टाकलं होतं. आता भाजपाच्या एका खासदारानं उद्धव ठाकरेंना गोडसे भक्त असं म्हटल्यानं एकच खळबळ उडाली आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते, प्रवक्ते आणि संसद जीव्हीएल नरसिंह राव यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. गोडसे भक्त उद्धव ठाकरेंना शुभेच्छा, असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. 

जीव्हीएल नरसिंह राव ट्विट करत म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल गोडसे भक्त उद्धव ठाकरेंना शुभेच्छा. तुम्ही आणि तुमच्या आमदारांनी आपली निष्ठा सत्तेसाठी गहाण ठेवली. सामनाचं "सोनिया नामा" असे नामकरण करून हे आत्मसमर्पण केलं आहे. तुमच्या सामना संपादकीयाला आता ते सहन करणार नाहीत.

तर दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवरही घणाघात केला आहे. उद्धव ठाकरेंची गळाभेट घेणं हा गळ्यात लटकवून घेण्याचा प्रकार असल्यानं राहुल गांधी घाबरलेले तर नाहीत ना?, शिवसेना सत्तेसाठी आवश्यक आहे, परंतु काँग्रेस आणि यूपीएसाठी ती अस्पृश्य आहे. सत्तेतल्या गुलामाच्या स्वरूपात स्वीकार, पण मित्राच्या रूपात नाही, असं म्हणत त्यांनी शिवसेनेवरही टीकास्त्र सोडलं आहे. कुमारस्वामींचा सन्मान आणि उद्धव ठाकरेंचा अपमान, हाच बाळासाहेबांचा शेवटचा अपमान आहे. प्रज्ञा सिंह ठाकूरवरून त्यांनी राहुल गांधींनाही खडे बोल सुनावले आहेत. राहुल गांधीजींनी ढोंगीपणा बंद करावा. सामनाचे संपादक उद्धव ठाकरेंनी गोडसेंना देशभक्त म्हटलं होतं. अशा विचारांच्या लोकांनाच तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवलं आहे. त्यामुळेच तुम्हाला शपथ ग्रहण समारंभात भाग घेण्यास लाज वाटली तर नाही ना, असंही ते म्हणाले आहेत.  राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी काल झालेल्या उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी झालेले नव्हते. त्याच पार्श्वभूमीवर नरसिंह राव यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.   

Web Title: congratulations to godse bhakt uddhav thackeray on taking over as cm of maharashtra says gvl narasimha rao