राज्यभर अवजड वाहनांवर धडक तपासणी मोहीम राबवा! अपघात रोखण्यासाठी प्रताप सरनाईकांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 17:22 IST2026-02-10T17:21:25+5:302026-02-10T17:22:08+5:30

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ घडलेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Conduct a crash inspection campaign on heavy vehicles across the state! Pratap Sarnaik's instructions to prevent accidents | राज्यभर अवजड वाहनांवर धडक तपासणी मोहीम राबवा! अपघात रोखण्यासाठी प्रताप सरनाईकांचे निर्देश

राज्यभर अवजड वाहनांवर धडक तपासणी मोहीम राबवा! अपघात रोखण्यासाठी प्रताप सरनाईकांचे निर्देश

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ घडलेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील अवजड वाहनांवर व्यापक आणि पारदर्शक तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश प्रताप सरनाईक यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मोटार परिवहन व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी स्पष्ट शब्दांत सूचित केले. अपघात रोखायचे असतील तर नियमांची केवळ अंमलबजावणी नव्हे, तर जागरूकतेची चळवळ उभी राहिली पाहिजे.

३ फेब्रुवारी रोजी झालेल्या अपघातामुळे तब्बल ३२ तास महामार्ग वाहतुकीसाठी विस्कळीत झाला. प्रवाशांचे, विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे मोठे हाल झाले. प्राथमिक पाहणीत चालकाच्या बेपर्वाईमुळे, वेगाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात घडल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर भाष्य करताना मंत्री सरनाईक म्हणाले, “चालकांच्या वाहन चालवण्याच्या पद्धतीवर नियंत्रण आणि प्रबोधन हीच अपघातमुक्त महामार्गाची गुरुकिल्ली आहे.”

वाहनांच्या तांत्रिक तपासणीला वेग, पारदर्शकतेवर भर

राज्यातील सर्व अवजड वाहनांची तांत्रिक तपासणी काटेकोर आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी, असे निर्देश देण्यात आले. विशेषतः फॉर्म 138/A अंतर्गत दिल्या जाणाऱ्या वाहन योग्यता प्रमाणपत्र प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यावर भर देण्यात आला. काही प्रादेशिक परिवहन कार्यालयांतून प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणपत्रे दिल्याचे निदर्शनास आल्याने त्याबाबत तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

 ‘ब्लॅक स्पॉट’वर विशेष लक्ष

महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणांची (ब्लॅक स्पॉट्स) माहिती चालकांपर्यंत पोहोचवणे, त्या भागात प्रवेश करण्यापूर्वी समुपदेशन व सूचना देणे, तसेच पोलीस व परिवहन विभागाने संयुक्तरीत्या जनजागृती मोहीम राबवणे—या उपाययोजना तातडीने अमलात आणण्याचे आदेश देण्यात आले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सविस्तर अहवाल

महामार्ग अपघात रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचा सविस्तर अहवाल येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सादर करण्याचे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी संबंधित विभागांना दिले. अपघाताची वेदना अजून ताजी असताना शासनाने घेतलेली ही धडक भूमिका म्हणजे केवळ प्रशासकीय हालचाल नाही, तर प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी उचललेले ठोस पाऊल आहे. नियम, नियंत्रण आणि जागरूकता या त्रिसूत्रीवरच सुरक्षित प्रवासाचा पाया उभा राहणार, असा स्पष्ट संदेश या बैठकीतून देण्यात आला.

Web Title : दुर्घटनाओं को रोकने के लिए राज्यव्यापी भारी वाहनों पर कार्रवाई: सरनाईक का आदेश

Web Summary : एक घातक दुर्घटना के बाद, प्रताप सरनाईक ने राज्यव्यापी भारी वाहनों पर कार्रवाई का आदेश दिया। उन्होंने सख्त तकनीकी निरीक्षण, प्रमाणन में पारदर्शिता और दुर्घटना संभावित क्षेत्रों को संबोधित करने पर जोर दिया। सुरक्षित यात्रा के लिए नियमों, नियंत्रण और जागरूकता पर ध्यान केंद्रित करते हुए बजट सत्र से पहले दीर्घकालिक समाधानों पर एक विस्तृत रिपोर्ट आनी है।

Web Title : Crackdown on Heavy Vehicles Statewide to Prevent Accidents: Sarnaik's Order

Web Summary : Following a fatal accident, Pratap Sarnaik ordered a statewide crackdown on heavy vehicles. He emphasized stricter technical inspections, transparency in certifications, and addressing accident-prone zones. A detailed report on long-term solutions is due before the budget session, focusing on rules, control, and awareness for safer travel.