शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
4
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
5
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
6
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
7
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
8
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
9
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
10
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
11
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
12
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
13
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
14
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
15
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
16
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
17
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
18
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
19
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
20
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांना मिळणार सौजन्यपूर्ण वागणूक

By admin | Updated: June 4, 2015 04:37 IST

उत्पन्नवाढीसाठी एसटी महामंडळातर्फे अनेक उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांचाच एक भाग महामंडळाने ‘प्रवासी सौजन्य सप्ताह’ उपक्रम राबविण्याचे

मुंबई : उत्पन्नवाढीसाठी एसटी महामंडळातर्फे अनेक उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांचाच एक भाग महामंडळाने ‘प्रवासी सौजन्य सप्ताह’ उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. जून, सप्टेंबर, डिसेंबर आणि मार्च २0१६ या महिन्यांत हा सप्ताह राबविण्याचा निर्णय झाल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. सध्या एसटी तोट्यात असून भारमानही फारच कमी आहे. हे पाहता अधिकाधिक प्रवासी एसटीकडे आकर्षित व्हावेत, यादृष्टीने महामंडळाकडून गेल्या काही वर्षांत अनेक उपक्रम राबविण्यात आले. अनेक उपक्रमांनंतर आता प्रवासी सौजन्य सप्ताह राबविण्यात येणार असून, पहिला सौजन्य सप्ताह ८ ते १४ जूनदरम्यान साजरा करण्यात येणार आहे. त्यानंतर हा सप्ताह सप्टेंबर, डिसेंबर, मार्च महिन्याच्या २१ ते २७ तारखेदरम्यान राबविण्यात येईल. या कालावधीत प्रत्येक स्थानकावर ध्वनिक्षेपकाद्वारे प्रवाशांचे स्वागत करण्यात येणार असून, प्रवाशांना शुभेच्छा देण्यात येतील. प्रवाशांना हवी असलेली माहिती अत्यंत सौजन्यपूर्ण भाषेत देण्यात येईल. तसेच सप्ताहाबाबत प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी प्रत्येक स्थानकात नोंदवही ठेवण्यात येणार आहे. त्यातील नकारात्मक प्रतिक्रियांची नोंद वरिष्ठ पातळीवर घेण्यात येणार असून संबंधितास प्रथम मार्गदर्शन, समुपदेशन करण्यात येईल. वागणुकीत सुधारणा न झाल्यास योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले. या सप्ताह कालावधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्थानकांनाही भेट देतील.