जोतिबा यात्रेला सशर्त परवानगी, केवळ २१ मानकऱ्यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:37 PM2021-04-23T16:37:18+5:302021-04-23T16:40:09+5:30

CoronaVirus JoytibaYatra Kolhapur : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभुमीवर दख्खनचा राजा श्री जोतिबाची चैत्र यात्रा पारंपारिक पद्धतीने केवळ २१ मानकऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. याबाबतचा निर्णय शुक्रवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई, आमदार विनय कोरे व पुजारी यांच्या संयुक्त बैठकीत झाला.

Conditional permission for Jotiba Yatra, decision of district administration: Attendance of only 21 dignitaries | जोतिबा यात्रेला सशर्त परवानगी, केवळ २१ मानकऱ्यांची उपस्थिती

जोतिबा यात्रेला सशर्त परवानगी, केवळ २१ मानकऱ्यांची उपस्थिती

googlenewsNext
ठळक मुद्देजोतिबा यात्रेला सशर्त परवानगी, जिल्हा प्रशासनाचा निर्णय केवळ २१ मानकऱ्यांची उपस्थिती

कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभुमीवर दख्खनचा राजा श्री जोतिबाची चैत्र यात्रा पारंपारिक पद्धतीने केवळ २१ मानकऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. याबाबतचा निर्णय शुक्रवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई, आमदार विनय कोरे व पुजारी यांच्या संयुक्त बैठकीत झाला.

दरवर्षी श्री जोतिबाची चैत्र यात्रा मोठ्या थाटामाटात साजरी होते. या यात्रेसाठी अन्य राज्यातून ८ ते ९ लाख भाविक उपस्थित असतात. मात्र गतवर्षी कोरोना संसर्गाला सुरुवात झाल्याने यात्रा रद्द करण्यात आली. सासनकाठ्यांनाही परवानगी नाकारली गेली व पालखी सजवलेल्या वाहनातून यमाई मंदिराकडे नेण्यात आली.

यंदा पून्हा लॉकडाऊन झाले असले तरी सलग दुसऱ्यावर्षी यात्रा रद्द करणे योग्य होणार नाही म्हणून आमदार विनय कोेरे यांनी शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेतली व नियमाधीन राहून यात्रा कशी पार पाडता येईल यावर चर्चा केली. त्यानुसार केवळ २१ मानकऱ्यांच्या उपस्थितीत यात्रेचे धार्मिक विधी पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.

Web Title: Conditional permission for Jotiba Yatra, decision of district administration: Attendance of only 21 dignitaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.