शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

विस्तारीकरणाला इथेनॉल निर्मितीची अट : सुभाष देशमुख 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2019 7:10 PM

साखर कारखानदारी सध्या अडचणीच्या काळातून जात असून, कर्जाचा डोंगर वाढत आहे...

ठळक मुद्दे साखर कारखान्याच्या क्षमता वाढीसाठी ऊस क्षेत्र फुगवले जातेयदर वर्षी मंत्री समितीच्या गाळप हंगामाच्या निर्णयावर साखर परवान्याचे वितरण अवलंबून

पुणे : साखर कारखानदारी अडचणीत असताना काही कारखाने ऊस गाळप क्षमता वाढविण्यासाठी उसाचे क्षेत्र फुगवून सांगत आहेत. जर एखाद्या कारखान्याला विस्तारीकरण करायचे असल्यास त्यांनी साखरेऐवजी क्षमतेच्या निम्मे इथेनॉल निर्मितीची अट घालावी असा पर्याय सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी येथे सुचविला. दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकच्या वतीने कल्याणी नगर येथील एका हॉटेलमधे आयोजित साखर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी देशमुख बोलत होते. साखर आयुक्त शेखर गायकवाड, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे, वैधमापन शास्त्र विभागाच्या पुणे विभागाच्या उप नियंत्रक सीमा बैस, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, समितीचे सदस्य अविनाश महागावकर या वेळी उपस्थित होते. देशमुख म्हणाले, साखर कारखानदारी सध्या अडचणीच्या काळातून जात असून, कजार्चा डोंगर वाढत आहे. कारखानदारीत व्यावसायिकता आणली की, नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारखाने अडचणीत आल्यास, त्यांचे कर्ज खाते असलेल्या बँका देखील अडचणीत येतात. परिणामी दोन्ही संस्था डबघाईला जातात. असे असताना काही कारखाने क्षमता विस्तारीकरण करीत आहेत. विस्तारीकरणाला काही आडकाठी नाही. मात्र, त्यासाठी एकमेकांच्या कारखाना क्षेत्रातील ऊस क्षेत्र आपलेच असल्याचे सांगितले जाते. कोणत्याही कारखान्याने असे क्षेत्र फुगवून सांगू नये. एखाद्या कारखान्याला क्षमता विस्तार करायचा असल्यास, कारखान्यापासून १५ किलोमीटर अंतरात ८० टक्के उसाच्या उपलब्धतेची अट घातली पाहिजे. तसेच, क्षमतेच्या ५० टक्के इथेनॉल निर्मिती त्या कारखान्याने केली पाहीजे. या अटींच्या आधारावरच संबंधित कारखान्याला विस्तारीकरणाची परवानगी दिली पाहिजे, असे देशमुख म्हणाले. दर वर्षी मंत्री समितीच्या गाळप हंगामाच्या निर्णयावर साखर परवान्याचे वितरण अवलंबून असते. यंदा दोन महिने आधीच साखर कारखान्यांना कार्यक्रम राबवून एका दिवसांत परवाने दिले जातील. परवाने देताना मंत्री समितीच्या निर्णयानुसार गाळप करावे अशी अट घातली जाईल, असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले. ----------------------

...तर साखर कारखाना या हंगामात बंद ठेवा : गायकवाडयंदा राज्यात केवळ ६३ लाख टन साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज आहे. आपल्या आर्थिक स्थितीचा विचार करुन यंदा साखर कारखाना सुरु करावा. तुलनेने कमी ऊस असल्यास एखादे युनिट सुरु ठेवावे, असा सल्ला साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला.

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेSubhash Deshmukhसुभाष देशमुखbankबँक