शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

औद्योगिक पार्कसाठी सवलतींचा पाऊस, रायगड, औरंगाबादमधील ठिकाणांचा समावेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 5:56 AM

केंद्र शासनाच्या रसायन व खते मंत्रालयाने किफायतशीर दरात औषधे उपलब्ध होण्याकरिता बल्क ड्रग हब उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात राज्य शासनाचा सहभाग असेल.

मुंबई : रायगड जिल्ह्यात २ हजार ४४२ कोटींचा बल्क ड्रग (औषधी) हब आणि औरंगाबाद येथे ऑरिक सिटीमध्ये ४२४ कोटींच्या वैद्यकीय उपकरण पार्कसाठी विशेष प्रोत्साहने देण्याचा निर्णय  मंत्रीडळाने घेतला. ही प्रोत्साहने पाच वर्षांसाठी असतील.एकेंद्र शासनाच्या रसायन व खते मंत्रालयाने किफायतशीर दरात औषधे उपलब्ध होण्याकरिता बल्क ड्रग हब उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात राज्य शासनाचा सहभाग असेल. कूण तीन ड्रग हब उभारले जातील.  औरंगबादच्या ऑरिक सिटीमध्ये चार वैद्यकीय उपकरणे निर्मिती पार्क असतील. बल्क ड्रग हबसाठी मूलभूत सुविधा उभारण्याकरिता जास्तीत जास्त एक हजार कोटी रुपये किंवा एकूण खर्चाच्या ७० टक्के अनुदान दिले जाईल. रायगडच्या हबसाठी मूलभूत सुविधांकरता १०० कोटी रुपये देण्यात येतील.अशी असतील प्रोत्साहने औद्योगिक विकास अनुदान- राज्यात होणाऱ्या प्रथम विक्रीच्या १०० टक्के राज्य, वस्तु व सेवा कर विद्युत शुल्क माफी- अनुदान उपभोगण्याच्या कालावधीपर्यंत मुद्रांक शुल्क माफी- गुंतवणूक कालावधीतील भूखंड खरेदी, भाडेपट्टा, बँक कर्जासाठी गहाण खत आदी सर्व प्रयोजनार्थ विद्युत दर सवलत रु.१.५ प्रति युनिट (१० वर्षांसाठी) अनुदान उपभोगण्याचा कालावधी- १० वर्ष ही विशेष प्रोत्साहने उद्योगांनी केलेल्या पात्र भांडवली गुंतवणूकीच्या १०० टक्के मर्यादेत राहतील व वार्षिक प्रोत्साहनांची मर्यादा पात्र प्रोत्साहने भागिले अनुदान उपभोगण्याचा कालावधीच्या सरासरीएवढा राहील. लघु, लहान व मध्यम घटकांना सामूहिक प्रोत्साहन योजना २०१९ प्रमाणे ५ टक्के व्याजदर सवलत दिली जाईल. 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला सवलती सामाईक सुविधा जशा सांडपाणी व्यवस्थापन, पाणीपुरवठा, वाफ, घनव्यवस्थापन इ. सुविधाकरिता १० वर्षाकरिता वीज दरामध्ये रु. २ प्रति युनिट सवलत   वरीलपैकी कोणतीही एक सवलत दिल्यास एमआयडीसीला वार्षिक कमाल ५० अर्थसहाय्य अथवा प्रत्यक्ष खर्चाच्या अनुषंगाने सवलत यापैकी जे कमी असेल ती रक्कम १० वर्षांसाठी राज्य शासनाकडून देण्यात येईल. 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारbusinessव्यवसाय