शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

मेट्रो 3च्या सुमारे 200 मीटर बोगद्याचे काम पूर्ण, अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केली पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 16:41 IST

प्रत्यक्ष काम पाहिल्यावर त्याची अनुभूती येते, समाधान वाटते, एवढ्या कमी वेळात मुंबईकरांसाठी मुख्यमंत्र्यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभारच मानायला हवेत, अशा शब्दात मुंबई भाजपा आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांच्यासह भाजपा आमदारांनी समाधान व्यक्त केले.

मुंबई- मेट्रो 3 कुलाबा ते सिप्झ या मेट्रोच्या कामाने वेग पकडला असून ही मेट्रो मुंबईकरांच्या पुढील पन्नास वर्षांसाठीची तरतूद आहे. प्रत्यक्ष काम पाहिल्यावर त्याची अनुभूती येते, समाधान वाटते, एवढ्या कमी वेळात मुंबईकरांसाठी मुख्यमंत्र्यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभारच मानायला हवेत, अशा शब्दात मुंबई भाजपा आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांच्यासह भाजपा आमदारांनी समाधान व्यक्त केले.मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात आज भाजपा आमदार भाई गिरकर, योगेश सागर, प्रसाद लाड यांनी मेट्रो 3 च्या कामाचा पाहणी दौरा केला. यावेळी एमएमआरडीएच्या अतिरिक्‍त आयुक्त अश्विनी भिडे आणि अन्य अधिकारीही उपस्थित होते. प्रथम आझाद मैदान येथील भुयारी मार्गाच्या कामाची पाहणी करण्यात आली. सुमारे 150 मीटर खाली उतरून प्रत्यक्ष बोगद्यात उतरून या सर्वांनी कामाची माहिती अश्विनी भिडे यांच्याकडून जाणून घेतली.येथे एका बोगद्याच्या कामाला सुरुवात झाली असून दुसऱ्या लाईनच्या बोगद्याचे मशीनही खाली उतरवण्यात आले आहे. नयानगर सह एकूण 200 मीटरच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले असून कामाने वेग पकडला आहे. तर त्यानंतर गिरगावातील मेट्रो स्टेशनचे जे काम सुरू आहे त्याचीही पाहणी केली. यावेळी बोलताना आमदार अ‍ॅड आशिष शेलार म्हणाले की, मेट्रो ची कामे सुरू आहेत त्यामुळे मुंबईकरांची आज गैरसोय होते आहे. पण त्यातून भविष्यात मोठे काम उभे राहणार आहे. आज मुंबईकर ज्या पध्दतीने गैरसोय सहन करीत आहेत त्याबद्दल त्यांचे आभारच मानायला हवेत. आम्ही लोकप्रतिनी आहोत. नेमके काम किती झाले आहेत व ते कसे केले जात आहे हे पाहता यावे म्हणुन आज आम्ही हा दौरा केला. काही प्रश्न आम्हाला होते तसेच लोक आम्हाला विचारतात त्याची माहितीही जाणून आम्ही घेतली.प्रत्यक्ष काम पाहिल्यावर इंजिनिरींगच्या कामाचा हा अविष्कार असल्याची अनुभूती येते. काम समाधानकारक सुरू आहे. ज्या वेगाने मुंबईत सर्व मेट्रो ची कामे सुरू आहेत ती पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईकरांच्या वतीने आभारच मानायला हवेत. ही मेट्रो मुंबईतील सिध्दीविनायक, मुंबा देवी, महालक्ष्मी, हाजी अली, माहिम दर्गा, चैत्यभूमी आणि माहीम चर्च सर्व धार्मिक स्थळे जोडणारी आहे. तसेच ती मोठी हास्पीटल यांनाही जोडणारी आहे. त्यामुळे मुंबई येणाऱ्या पर्यटकांना सुविधा होईलच शिवाय मुंबईकरांची ही गैरसोय दूर करणारी आहे. असेही आमदार अ‍ॅड आशिष शेलार यांनी यावेळी सांगितले.दरम्यान, आमदार अ‍ॅड. आशिष शेलार आणि सर्वच भाजप आमदारांनी कामाबद्दल समाधान व्यक्त करीत अधिकारी, काम करणार्‍या कामगार, इंजिनिअर व त्यांच्या टीमचे कौतुक करून आभार ही मानले. आमदार प्रसाद लाड यांनी ही कामाबाबत समाधान व्यक्त करीत ही मेट्रो मुंबईकरांची भविष्य आहे अशा भावना व्यक्त केल्या तर आमदार भाई गिरकर आणि योगेश सागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले दिल्ली आणि अन्य शहरात मेट्रो होती पण मुंबईकरांसाठी ही सेवा मुख्यमंत्र्यामुळे उपलब्ध होणार आहे असे सांगितले. तर पश्चिम उपनगरातील मुंबईकर कोणत्याही अडथळ्यावीना या मेट्रोमुळे कुलाब्या पर्यंत येईल. त्यामुळे ही सेवा अत्यंत महत्त्वाचीच ठरेल असे सांगितले.

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारMetroमेट्रोMumbaiमुंबई