FDA मधील लाचखोरी आणि भ्रष्टाचाराची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे; अधिकाऱ्याच्या 'उचापती' रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 16:25 IST2026-02-25T16:08:14+5:302026-02-25T16:25:18+5:30

सामान्य जनतेच्या जीवनाशी थेट निगडित असलेल्या अन्न आणि औषध प्रशासनात ढिसाळ कारभारावर आता कारवाईची मागणी सुरू आहे. दरम्यान, आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच निवेदन देण्यात आले आहे. या प्रकरणी लक्ष घालण्याची आणि कारवाईची विनंती करण्यात आली आहे. 

Complaint of bribery and corruption in FDA directly to the Chief Minister Official's 'boss' on radar | FDA मधील लाचखोरी आणि भ्रष्टाचाराची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे; अधिकाऱ्याच्या 'उचापती' रडारवर

FDA मधील लाचखोरी आणि भ्रष्टाचाराची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे; अधिकाऱ्याच्या 'उचापती' रडारवर

मागील काही दिवसांपासून अन्न आणि औषध विभाग चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी झालेले लाचखोरीचे प्रकरण गाजत असतानाच या विभागातील इतर अनेक गैरव्यवहारही आता उघड होत आहेत. सामान्य जनतेच्या जीवनाशी थेट निगडित असलेल्या अन्न आणि औषध प्रशासनात ढिसाळ कारभारावर आता कारवाईची मागणी सुरू आहे. दरम्यान, आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच निवेदन देण्यात आले आहे. या प्रकरणी लक्ष घालण्याची आणि कारवाईची विनंती करण्यात आली आहे. 

BSNL च्या संचालकांचा 'नवाबी' थाट! अंतर्वस्त्रांच्या खरेदीपासून कंगव्यापर्यंत ५० अधिकाऱ्यांना कामाला लावलेले, कारणे दाखवा नोटीस

विभागातील सह आयुक्त उल्हास इंगवले यांच्या विरोधात तक्रारदार सूरज केराप्पा पडवळकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे विनंती केली आहे. या भ्रष्ट वर्तुळाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

उल्हास इंगवले या अधिकाऱ्यांच्याविरुद्ध केवळ तक्रारदारच नव्हे तर लोकप्रतिनिधींनीही सभागृहात आवाज उठवला  होता. आमदार श्वेता महाले  यांनीही आवाज उठवला. इंगवले यांच्या बेकायदेशीर संपत्तीची आणि भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

आमदार अमोल मिटकरी यांनीही या प्रश्नावर आवाज उठवला होता. "इंगवले हाच प्रतिबंधित गुटख्याच्या विक्रीत सामील आहे," असा खळबळजनक आरोप मिटकरी यांनी विधान परिषदेत केला होता. मात्र, सभागृहात विभागीय चौकशीचे आश्वासन देऊनही अद्याप कारवाई का झाली नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातील मुद्दे

नियमानुसार बदली न होता इंगवले अनेक वर्षे एकाच पदावर कसे चिकटून आहेत?

मुख्यालय सह आयुक्त (अन्न) हा अतिरिक्त कार्यभार त्यांनी बेकायदेशीरपणे स्वतःकडेच कसा ठेवला आहे?

प्रतिबंधित गुटख्याच्या विक्रीत सहभाग असल्याचा आरोप होऊनही ते अद्याप पदावर कसे?

दक्षता सह आयुक्तांकडून झालेली चौकशी आणि तिचा अहवाल अद्याप सादर का झाला नाही?

महाराष्ट्र पोलिसांना नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत देण्यास प्रतिबंध करण्याचा आदेश इंगवले यांनी कोणत्या अधिकारात काढला?

त्यांच्या संपत्तीची सखोल चौकशी करण्याची मागणी दुर्लक्षित का राहिली?

विभागाची प्रतिमा सुधारण्यासाठी त्यांना तातडीने पदमुक्त करावे.

हा भ्रष्ट अधिकारी विभागाच्या प्रभावी कामात अडथळा ठरत आहे. जर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी लावून या अधिकाऱ्याच्या कचाट्यातून विभागाची सुटका केली, तरच भेसळ रोखणे आणि जनतेचे आरोग्य जपणे शक्य होईल," असे मत तक्रारदार सूरज पडवळकर यांनी व्यक्त केले आहे.

Web Title : FDA में रिश्वतखोरी की शिकायत सीधे मुख्यमंत्री से; अधिकारी के भ्रष्टाचार पर जांच

Web Summary : FDA में भ्रष्टाचार, विशेष रूप से अधिकारी उल्हास इंगवले के खिलाफ, मुख्यमंत्री फडणवीस से शिकायत की गई। आरोपों में अवैध गुटखा बिक्री और अनुपातहीन संपत्ति शामिल हैं। विधायकों ने इंगवले की कार्रवाई की जांच और विभाग की दक्षता में सुधार के लिए उन्हें पद से हटाने की मांग की।

Web Title : FDA Bribery Complaint Directly to CM; Officer's Misdeeds Under Scrutiny

Web Summary : Complaint filed with CM Fadnavis regarding corruption in FDA, specifically against officer Ulhas Ingwale. Allegations include illegal gutka sales and disproportionate assets. Legislators demand investigation into Ingwale's actions and removal from his post to improve department efficiency.