शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधीक्षकांसह चौघांवर आयोगाचा ठपका

By admin | Updated: June 15, 2014 02:32 IST

सरकारने हा अहवाल स्वीकारताना संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करणारा कृती अहवालही विधानसभेत सादर केला.

मुंबई : पुणे जिल्ह्णातील मावळ येथे आंदोलकांना पांगविण्यासाठी चौकशी करणाऱ्या आयोगाने तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक,पोलीस निरिक्षक अशोक पाटील,पोलीस निरिक्षक यशवंत गवारी व पोलीस उपनिरिक्षक गणेश माने यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले होते. सरकारने हा अहवाल स्वीकारताना संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करणारा कृती अहवालही विधानसभेत सादर केला.पिंपरी-चिंचवड बंद पाणीपुरवठा योजनेला विरोध करण्यासाठी द्रुतगती मार्गावर आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांना पांगविण्यासाठी मावळ येथे पोलिसांनी सुरूवातीला केलेला गोळीबार समर्थनीय होता. परंतु जमावाची पांगापांग झाल्यानंतरही ज्या पद्धतीने आंदोलकांवर बेछूट गोळीबार केला गेला तो असमर्थनीय आहे, असा स्पष्ट ठपका मावळ गोळीबाराची चौकशी करणाऱ्या निवृत्त न्यायाधीश एम.जी.गायकवाड आयोगाने ठेवला होता. पिंपरी-चिंचवड पाणीपुरवठा योजनेला विरोध करण्यासाठी मावळ येथील गावक-यांनी ९ आॅगस्ट २०११ रोजी निदर्शने केली होती.मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे बंद पाडण्याचाही प्रयत्न झाला होता. आंदोलकांवर याप्रसंगी पोलिसांनी गोळीबारही केला होता.या गोळीबारात १४ जण जखमी झाले होते तर तीन आंदोलकांचा मृत्यू झाला होता. सरकारने या गोळीबाराची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्या. एम. जी. गायकवाड यांचा चौकशी आयोग नेमला होता. सरकारने आयोगाचा अहवाल आपल्या कृती अहवालासह शनिवारी विधानसभेत सादर केला. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सुरूवातीला जो बळाचा वापर केला त्याचे आयोगाने समर्थन केले आहे. मात्र जमावाची पांगापांग झाल्यानंतरही तत्कालीन पोलीस अधिक्षक संदीप कर्णिक यांनी एस.एल.आर या रायफलीमधून केलेला गोळीबार असमर्थनीय आहे तसेच पोलीस निरीक्षक अशोक पाटील, पोलीस निरीक्षक यशवंत गवारी व पोलीस उपनिरिक्षक गणेश माने यांनी केलेला गोळीबारही समर्थनीय नाही असा स्पष्ट निष्कर्ष चौकशी आयोगाने व्यक्त केला असून, त्याची दखल सरकारने घेतली आहे. या अधिकाऱ्यांवर कायदेशीर पद्धत अनुसरून प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे कृती अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. (विशेष प्रतिनिधी)