महामुंबईतील राज्य महिला कर्मचाऱ्यांसाठी लवकरच ‘कम अर्ली-गो अर्ली’ सवलत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 06:24 IST2026-03-11T06:24:30+5:302026-03-11T06:24:54+5:30

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची परिषदेत घोषणा

'Come Early-Go Early' discount soon for women state employees in Greater Mumbai | महामुंबईतील राज्य महिला कर्मचाऱ्यांसाठी लवकरच ‘कम अर्ली-गो अर्ली’ सवलत 

महामुंबईतील राज्य महिला कर्मचाऱ्यांसाठी लवकरच ‘कम अर्ली-गो अर्ली’ सवलत 

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील (महामुंबई) शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘कम अर्ली-गो अर्ली’ सवलत देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी विधानपरिषदेत केली.   

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने झालेल्या विशेष चर्चेला उपमुख्यमंत्री पवार यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या, ‘कम अर्ली-गो अर्ली’ या निर्णयानुसार मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना सकाळी ९:१५ ते ९:४५ दरम्यान कार्यालयात उपस्थित व्हावे लागेल. महिला कर्मचारी कार्यालयात जितकी मिनिटे लवकर  येतील, तितकी मिनिटे त्यांना लवकर निघता येईल.

महिला कर्मचाऱ्यांना ३० मिनिटांची मुभा देण्यात येणार आहे. कार्यालयात अर्धा तास लवकर या आणि संध्याकाळी तेवढाच वेळ लवकर घरी जा, असे या सवलतीचे स्वरूप असेल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले. 
या निर्णयामुळे गर्दीच्या वेळी महिलांची होणारी गैरसोय कमी होऊन त्यांना दिलासा मिळेल, असेही त्यांनी सांगितले. 

महिलांच्या समस्यांसाठी ५१ भरोसा सेल 
 
महिलांच्या सुरक्षेबाबत बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी राज्यात ‘ऑपरेशन मुस्कान’ अभियानाअंतर्गत जुलै २०१५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत १४ मोहिमा राबवून ४२ हजार ५९४ बालकांचा शोध घेण्यात आला आहे. शोधमोहिमेतून ५ हजार ६६ महिला आणि २ हजार ७७१ बालकांचा शोध घेण्यात आला आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये ‘मिसिंग सेल’ कार्यरत असून, महिलांच्या समस्यांसाठी ५१ ‘भरोसा सेल’ कार्यान्वित करण्यात आले आहेत.

अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढवण्याबाबत सकारात्मक

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधन वाढविण्याबाबत आणि पायाभूत सुविधांबाबत शासन सकारात्मक आहे. महिला शासकीय कर्मचाऱ्यांना १८० दिवसांची प्रसूती रजा मंजूर केली असून, प्रसूती रजेनंतर गरज भासल्यास कमाल एक वर्षापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय अर्धवेतनी रजा घेण्यासही परवानगी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title : मुंबई: राज्य महिला कर्मचारियों को जल्द ही 'कम अर्ली-गो अर्ली' लाभ।

Web Summary : उपमुख्यमंत्री ने मुंबई की राज्य महिला कर्मचारियों के लिए 'कम अर्ली-गो अर्ली' की घोषणा की। वे सुबह 9:15-9:45 के बीच आ सकती हैं और उसी अनुसार जल्दी जा सकती हैं। महिलाओं के मुद्दों के लिए 51 'भरोसा सेल' सक्रिय हैं। आंगनवाड़ी कार्यकर्ताओं के मानदेय में वृद्धि पर भी विचार किया जा रहा है।

Web Title : Mumbai: State women employees to soon get 'Come Early-Go Early' benefit.

Web Summary : Deputy CM announced 'Come Early-Go Early' for Mumbai's women state employees. They can arrive 9:15-9:45 AM and leave early accordingly. 51 'Bharosa Cells' are active for women's issues. Anganwadi workers' honorarium increase is also being considered.