शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाच्या हिताचा ठाकरे सरकारकडून कोल्ड ब्लडेड खून; आशिष शेलार यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 18:32 IST

Maratha Reservation : आम्हाला शिकवू नका. नाकाने कांदे सोलू नका. मराठा समाजाच्या हिताची भूमिका घ्या, शेलार यांनी सरकारला ठणकावलं

ठळक मुद्देआम्हाला शिकवू नका. नाकाने कांदे सोलू नका. मराठा समाजाच्या हिताची भूमिका घ्या, शेलार यांनी सरकारला ठणकावलंEWS आरक्षणात ठाकरे सरकारचं कर्तुत्व काय, शेलार यांचा सवाल

बीड : "ज्या पध्दतीने कोल्ड ब्लडेड खून करणाऱ्यांची पूर्व तयारी व पूर्ण तयारी दिसत नाही. आरोपीचा भोळाभाबडा चेहरा समोर असला तरी दिसत नाही. तशाच प्रकारे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आता शिवसेना यांनी मराठा समाजाच्या हिताचा कोल्ड ब्लडेड खून केला," असा गंभीर आरोप भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी आज येथे केला. मराठा आरक्षणाबाबत राज्यात निर्माण झालेल्या स्थिती बाबत चर्चा व  मराठा समाजाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी भाजपाचे नेते महाराष्ट्र दौरा करीत असून यातील चार दिवसाचा बीड, परळी, नांदेड असा दौरा भाजपा नेते आमदार आशिष शेलार करत आहेत."जेव्हा कालेलकर आयोग आला ज्यामध्ये मराठा समाजाचा हिताचा विचार झाला पण तो अहवाल तत्कालीन सरकारने टेबलच केला नाही. मंडल आयोगाच्या वेळी एक संधी घेता आली असती ती घेतलीच नाही. बापट आयोगाने मराठा समाजाला आरक्षण नाकारले पण तो अहवाल ही सरकारने नाकारला नाही. वेगवेगळ्या आयोगाने मराठा समाजाला आरक्षण नाकारणाऱ्या शिफारशी केल्या त्या शिफारशी तत्कालीन काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारने नाकारल्या नाहीत. त्यानंतर राणे समिती आली. खरंतर आयोगाची गरज होती पण समिती नेमली. अशा प्रकारे एक एक करत मराठा समाजाच्या हिताचा खून करण्याचे काम तत्कालीन आणि आजच्या सरकार मधील पक्षांनी केले. आज हीच लोकं भाजपला शिकवण्याचे काम करीत आहेत. आम्हाला शिकवू नका. नाकाने कांदे सोलू नका. मराठा समाजाच्या हिताची भूमिका घ्या," अशा शब्दांत त्यांनी ठाकरे सरकारला ठणकावले.

अहवाल पूर्ण मांडला नाही"गायकवाड आयोगाने मराठा समाजाला मागास ठरवून अहवाल दिला. तो अहवाल संपूर्ण पणे सर्वोच्च न्यायालयात ठाकरे सरकारने मांडला नाही. अन्यथा समाजाला मिळालेले फायदे टीकले असते. म्हणून मराठा समाजाला संपूर्ण आरक्षण हवे आहे त्यासाठी मराठा समाजाच्या आक्रोशाला भाजप पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून साथ देत आहे. त्यासोबतच ठाकरे सरकारने मराठा समाजाला 3 हजार कोटींचे पँकेज द्यावे, ओबीसींच्या सवलती मराठा समाजाला लागू कराव्यात, तसेच अन्य कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला नख लावू नका," अशा मागण्या त्यांनी यावेळी केल्या. 

"ईडब्ल्यूएस मध्ये मराठा समाजाला आरक्षण ठाकरे सरकारने दिले. त्यात तुमचे कर्तृत्व काय? आजपर्यंत मराठा मोर्चाची खिल्ली उडवणाऱ्या शिवसेनेची, छत्रपतींच्या वंशजाकडे पुरावे मागण्याची भावनाशून्यता दिसलीच होती आता कर्तृत्व शून्यतापण दिसली. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबतही पंधरा महिने काहीच न केल्याने ठाकरे सरकारने ओबीसी समाजाचे ही मोठे नुकसान केले. समाजासमाजात तेढ आणि भांडणे लावण्याचे काम इंग्रजांप्रमाणे ठाकरे सरकार करते आहे," असा आरोप ही त्यांनी केला. 

टॅग्स :BJPभाजपाAshish Shelarआशीष शेलारmarathaमराठाMaharashtraमहाराष्ट्रBeedबीड