कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ : नेहरू सायन्स म्युझियम येथे भुयारीकरण सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 19:43 IST2018-08-20T19:41:49+5:302018-08-20T19:43:06+5:30
मुंबई मेट्रो ३ चे नेहरू सायन्स म्युझियम , आचार्य अत्रे चौक आणि वरळी मेट्रो स्थानकाच्या भुयारीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ : नेहरू सायन्स म्युझियम येथे भुयारीकरण सुरू
मुंबई - मुंबईमेट्रो ३ चे नेहरू सायन्स म्युझियम , आचार्य अत्रे चौक आणि वरळी मेट्रो स्थानकाच्या भुयारीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे. एमएमआरसी चे हे काम पॅकेज ३ च्या अंतर्गत असून ते नियोजित वेळेत पूर्ण होईल .
या भुयारीकरणाला वापरले जाणारे टीबीएम 'तानसा-१' या मशीनची लांबी ८९ मीटर असून वजन तब्बल ४०६ मेट्रिक टन इतके आहे. नेहरू सायन्स म्युझिअम ते वरळीपर्यंतचे एकूण २.२ किमी अंतरचे भुयार या मशिनद्वारे खोदले जाणार आहे. तसेच या मार्गाचे भुयारीकरण झाल्यानंतर सायन्स म्युझिअम ते मुंबई सेन्ट्रल या मार्गाचे भुयारीकरण सुरू होईल .
" पॅकेज ३ चे भुयारीकरण हे प्रकल्पाचे मध्यवर्ती भुयारीकरण असून ते ठरलेल्या वेळेत यशस्वीरीत्या पूर्ण होईल , "असा विश्वास एमएमआरसीच्या व्यवस्थपकीय संचालक श्रीमती अश्विनी भिडे यांनी व्यक्त केला . मुंबई मेट्रो ३ या संपूर्ण प्रकल्पासाठी लागणारी एकूण १७ पैकी १६ टीबीएम मशीन्स मुंबईत दाखल झाली असून सध्या१३ मशीन्स मुंबई मेट्रो ३ साठी कार्यरत आहेत.