शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

'भाजपाला तंगड्यात तंगडं घालायची सवय; मला अनुभव नसल्यानेच ते अडचणीत आणताहेत!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 15:59 IST

महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात आनंदाचं वातावरण आहे

नागपूर: नागपूरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस होता. अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी महाविकासआघाडीच्या विधिमंडळ पक्ष आमदारांची महत्वपूर्ण बैठक बोलवण्यात आली होती. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपाने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्यावरुन आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर काही वेळ वादळी चर्चा झाल्यानंतर सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आले होते. भाजपाच्या या भूमिकेबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकासआघाडीच्या बैठकीत टीका केली आहे.

महाविकासआघाडीतील प्रमुख नेते व आमदारांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. मला अनुभव नसल्यानं भाजपा अडचणी आणण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच भाजपाला तंगड्यात तंगड घालण्याची सवय असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. तसेच महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात आनंदाचं वातावरण आहे त्यामुळे जनतेचं काम करा, त्यांचा भ्रमनिरास होईल असं काम करु नका असं आवाहन त्यांनी सर्व आमदारांना केले. तसेच गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मोठा वाद सुरू आहे. या कायद्यामुळे देशभरात हिंसाचार घडत असताना आमदारांनी आपल्या मतदार संघात ही परिस्थिती निर्माण होऊ नये याची काळजी घेण्याचा सल्ला देखील उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिला.

स्वातंत्र्य वीर सावरकरांबाबत आमची भावना होती ती आहे, कालही होती, आजही आहे, उद्याही तशीच राहेल, त्यात काही फरक पडणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. माफी मागायला मी काही सावरकर नाही, राहुल गांधींनी असं म्हटल्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे. राहुल गांधींच्या या विधानावरून आता भाजपानं त्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. राहुल गांधींच्या या विधानावरून शिवसेनेनंही आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातूनही राहुल गांधींना कडक शब्दांत इशारा दिला आहे. वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू, गांधी यांच्याप्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला असल्याचे सांगत त्यांचा सन्मान करायलाच हवा असं संजय राऊत यांनी स्पष्टीकरणं दिलं होतं.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक