पीककर्ज अन् मध्यम मुदत कर्जातील फरक कळतो का ? भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 16:38 IST2020-01-09T16:31:25+5:302020-01-09T16:38:15+5:30
महाविकास आघाडीतील अनेक नेते नाराज आहेत. या नाराजीतून महाविकास आघाडीचे सरकार आपोआप कोसळेल, त्यासाठी ताकद लावण्याची गरज नसल्याचे पाटील यांनी नमूद केले. दरम्यान इंदापूरचे नेते हर्षवर्धन पाटील यांचं नक्कीच पुनर्वसन केलं जाईल, असंही त्यांनी उपस्थितांना सांगितले.

पीककर्ज अन् मध्यम मुदत कर्जातील फरक कळतो का ? भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल
मुंबई - महाविकास आघाडीची सत्तास्थापन होऊन महिना उलटला आहे. मात्र अजुनही भाजप नेत्यांना महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल याची आशा लागलेली आहे. किंबहुना भाजपच्या आघाडीच्या नेत्यांकडून सरकार कोसळण्याचाच पुनरोच्चार करण्यात येत आहे. त्यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पीककर्ज आणि मध्यम मुदत कर्ज यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोचक प्रश्न विचारला आहे. इंदारपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्यातील शेतऱ्यांना ठाकरे सरकारने दिलेली कर्जमाफी फसवी आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांना पीककर्ज आणि मध्यम मुदत कर्जातील फरक कळतो का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. या कर्जमाफीने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे सांगत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.