“…तर आम्ही ताकदीने लढायला तयार”; बारामती, राहुरी पोटनिवडणुकीवर CM देवेंद्र फडणवीस थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 14:35 IST2026-03-15T14:33:33+5:302026-03-15T14:35:32+5:30

CM Devendra Fadnavis PC News: बारामती आणि राहुरी या दोन ठिकाणी लवकरच पोटनिवडणूक लागणार असल्याचे म्हटले जात आहे.

cm devendra fadnavis spoke directly on baramati and rahuri by election | “…तर आम्ही ताकदीने लढायला तयार”; बारामती, राहुरी पोटनिवडणुकीवर CM देवेंद्र फडणवीस थेट बोलले

“…तर आम्ही ताकदीने लढायला तयार”; बारामती, राहुरी पोटनिवडणुकीवर CM देवेंद्र फडणवीस थेट बोलले

CM Devendra Fadnavis PC News: नागरिकांनी केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे वागले पाहिजे. काही राजकीय पक्ष नागरिकांमध्ये जाणीवपूर्वक भीती निर्माण करत आहेत. पॅनिक सिच्युएशन झाली तर असलेली चांगली परिस्थिती खराब होण्याची शक्यता आहे. ही भीती पसरली तर लोक गॅसची साठवणूक करतील. केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी आपल्यासाठी सर्व गोष्टी नीट करत आहेत, त्यावर विश्वास ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीबाबत प्रश्न विचारण्यात आला. बारामती आणि राहुरी या दोन्ही जागांवर होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा आहे. यासाठी सर्वांनी एकमताने निर्णय घ्यावा असा आमचा प्रयत्न आहे. मात्र, जर ही निवडणूक आमच्यावर लादली गेली, तर आम्ही ती पूर्ण ताकदीने लढायला तयार आहोत, असे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.

निवडणूक भावनिक मुद्द्यावर बिनविरोध लढवणार की नवीन चेहरा देणार

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये निधन झाले होते. या जागेवर भाजप घरातीलच एखाद्या सदस्याला उमेदवारी देत ही निवडणूक भावनिक मुद्द्यावर बिनविरोध लढवणार की नवीन चेहरा देणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची जागा रिक्त झाली असून सध्या राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवार निवडणूक रिंगणार उतरणार आहेत. सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारल्यापासून ६ महिन्यांच्या आत विधिमंडळाचे सदस्य होणे अनिवार्य आहे.

 

Web Title : बारामती, राहुरी उपचुनाव लड़ने को तैयार: मुख्यमंत्री फडणवीस

Web Summary : मुख्यमंत्री फडणवीस ने केंद्र सरकार पर विश्वास रखने का आग्रह किया, और घबराहट के खिलाफ चेतावनी दी। उन्होंने बारामती और राहुरी में निर्विरोध चुनाव की इच्छा व्यक्त की, लेकिन जरूरत पड़ने पर मजबूती से लड़ने का दावा किया। भाजपा विधायक की मृत्यु के बाद राहुरी उपचुनाव के लिए परिवार के सदस्य पर विचार कर रही है; सुनेत्रा पवार बारामती सीट से चुनाव लड़ सकती हैं।

Web Title : Ready to fight Baramati, Rahuri by-elections: CM Fadnavis

Web Summary : CM Fadnavis urges trust in the central government, cautioning against panic. He expressed a desire for unopposed elections in Baramati and Rahuri but asserted readiness to contest strongly if necessary. BJP considers family member for Rahuri bypoll after MLA's death; Sunetra Pawar may contest Baramati seat.