मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना पुन्हा धक्का! बांधकाम व्यावसायिकाची 'मित्र'मधून उचलबांगडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 12:10 IST2025-03-07T12:00:18+5:302025-03-07T12:10:53+5:30

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अजय आशर यांना मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मित्र’ संस्थेच्या उपाध्यक्षपदावरून हटवलं

CM Devendra Fadnavis removed Ajay Ashar close aide of Eknath Shinde from the post of Vice President of the MITRA | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना पुन्हा धक्का! बांधकाम व्यावसायिकाची 'मित्र'मधून उचलबांगडी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना पुन्हा धक्का! बांधकाम व्यावसायिकाची 'मित्र'मधून उचलबांगडी

Ajay Asher Removed From MITRA: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का दिल्याचे म्हटलं जात आहे. एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अजय आशर यांना मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मित्र’ संस्थेच्या उपाध्यक्षपदावरून हटवलं आहे. अजय आशर यांच्या उचलबांगडीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राजकीय धक्का बसल्याचे म्हटलं जात आहे. दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता पदमुक्त केलं होतं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना निवृत्त झालेले कैलास जाधव यांना एमसीआरडीसीच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी कैलास जाधव यांना तात्काळ सेवामुक्त करण्याचे आदेश दिले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात घेतलेले अनेक महत्त्वाचे निर्णय फडणवीस सरकारकडून बदलले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिल्याचे म्हटलं जात आहे. नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशनची निर्मिती केली आहे. एकनाथ शिंदे यांचे सरकारअसताना २०२२ मध्ये उपमुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय अजय आशर यांना मित्राचे उपाध्यक्ष केलं होते. मात्र आता मुख्यमंत्री फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांचे विश्वासू अजय आशर यांची मित्रच्या नियमित मंडळावरुन उचलबांगडी केली आहे. त्यांच्या जागी दिलीप वळसे पाटील, राणा जगजितसिंह पाटील, राजेश क्षीरसागर यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

अजय आशर हे मोठे बांधकाम व्यावसायिक असून आणि आशर ग्रुपचे चेअरमन आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मित्रा संस्थेच्या उपाध्यक्षपदी अजय आशर आणि डॉ.राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली होती. अजय आशर यांचे बांधकाम क्षेत्र, सामाजिक, नागरी आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठं नाव आहे. दोन वर्षापूर्वी झालेल्या दावोस दौऱ्याच्या शिष्टमंडळात ‘मित्र’च्या अजय आशर यांचाही समावेश होता.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या काही निर्णयांवरुन मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यातील 'शीतयुद्ध'ची चर्चा फेटाळून लावली होती. काही लोकांना कथा तयार करण्यात सलीम-जावेद यांच्याशी स्पर्धा करायची आहे. आम्हा दोघांना ओळखणाऱ्या लोकांना आम्ही एकत्र आल्यावर काय करतो ते कळेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं.

Web Title: CM Devendra Fadnavis removed Ajay Ashar close aide of Eknath Shinde from the post of Vice President of the MITRA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.