cm devendra fadnavis preparing shiv senas candidate list says uddhav Thackeray | मुख्यमंत्रीच तयार करताहेत शिवसेनेची यादी; उद्धव ठाकरेंच्या दाव्याने भुवया उंचावल्या

मुख्यमंत्रीच तयार करताहेत शिवसेनेची यादी; उद्धव ठाकरेंच्या दाव्याने भुवया उंचावल्या

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेची युती होणार का, 'फिफ्टी-फिफ्टी'चा फॉर्म्युला डावलून भाजपाने दिलेली कमी जागांची ऑफर शिवसेना स्वीकारणार का, यावरून उलटसुलट चर्चा सुरू असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. 

कभी हां, कभी ना, मनसेचं काही ठरेना; राज ठाकरेंची बैठक ठोस निर्णयाविना!

'युतीची बोलणी अंतिम टप्प्यात आली आहेत. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच शिवसेनेची यादीही तयार करायला सांगितली आहे. त्यांच्याकडून ती आली की आम्ही आमच्या नेत्यांसमोर ठेवू आणि त्यावर निर्णय घेऊ', अशी युतीच्या जागावाटपाची अजब नीती उद्धव यांनी सांगितली. उद्धव यांच्या या विधानाचे दोन अर्थ काढले जाऊ शकतात. भाजपा-शिवसेनेत सगळं अगदी सामोपचाराने सुरू आहे, असं भासवण्याचा त्यांचा हा प्रयत्न असू शकतो. मात्र त्याचवेळी, 'मोठ्या भावा'च्या रुबाबात भाजपा नेते त्यांना हवं तेच शिवसेनेवर थोपवण्याचा प्रयत्न करत आहेत, म्हणून मग त्यांनाच यादी करायला सांगितली, असा दुसरा अर्थही यातून निघतो. त्यातला कुठला अर्थ योग्य हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.   

खाकीतला माणूस दिसणार खादीत; प्रदीप शर्मा आज करणार शिवसेनेत प्रवेश 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार भास्कर जाधव यांनी आज 'घरवापसी' केली. राष्ट्रवादीचं घड्याळ काढून त्यांनी 'शिवबंधन' बांधलं. 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा शिवसेना प्रवेश झाला. 'एन्काउंटर स्पेशालिस्ट' म्हणून ओळखले जाणारे पोलीस अधिकारी प्रदीप शर्माही आज शिवसेनेचा झेंडा हाती घेणार आहेत. विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागलीय, तसं भाजपा-शिवसेनेतील 'इनकमिंग'ला वेग आल्याचं पाहायला मिळतंय.

Web Title: cm devendra fadnavis preparing shiv senas candidate list says uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.