HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 14:23 IST2025-05-04T13:55:18+5:302025-05-04T14:23:43+5:30

Maharashtra HSC Board Result 2025 Date: बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल सोमवारी ५ मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे.

Class 12th results to be announced tomorrow can be viewed online from 1 pm | HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

Maharashtra HSC Result 2025 Date: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सोमवारी ५ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.

या वर्षी बारावी बोर्डाच्या परीक्षा ११ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. त्यासाठीची प्रात्यक्षिक परीक्षा त्यापूर्वी २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२५ दरम्यान घेण्यात आल्या होत्या. परीक्षेसाठी  सुमारे ८.१ लाख विद्यार्थी, ६.९ लाख विद्यार्थिनी आणि ३७ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची तयारी पूर्ण केल्याची माहिती दिली आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. आता या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना उद्या दुपारी एक वाजता ऑनलाइन पाहता येणार आहे. त्याआधी बोर्डाची पत्रकार परिषद होणार असून त्यामध्ये विस्तृत माहिती देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. अधिकृत संकेतस्थळासह विविध संकेतस्थळांवर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा योग्य नोंदणी क्रमांक किंवा रोल नं व पासवर्ड भरणे आवश्यक राहणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या निकालाच्या अधिकृत सूचनेनुसार बारावी बोर्डाचा निकाल mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल तपासता येणार आहे.

या संकेतस्थळांवर तपासू शकता निकाल

mahahsscboard.in

mahresult.nic.in

hscresult.mkcl.org

hsc.mahresults.org.in
 

Web Title: Class 12th results to be announced tomorrow can be viewed online from 1 pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.