वनमंत्री मुनगंटीवार यांचा निरुपम यांच्याविरोधात दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 03:46 IST2018-12-14T03:45:53+5:302018-12-14T03:46:18+5:30

अवनी वाघिणीच्या मृत्यूचे प्रकरण, चंद्रपूर न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा

Claims against Forest Minister Mungantiwar's Nirupam | वनमंत्री मुनगंटीवार यांचा निरुपम यांच्याविरोधात दावा

वनमंत्री मुनगंटीवार यांचा निरुपम यांच्याविरोधात दावा

मुंबई : अवनी वाघीण मृत्यूप्रकरणात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरूवारी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा ठोकला. मुनगंटीवार स्वत: चंद्रपूर न्यायालयात हजर होते. अवनी वाघिणीला ठार करण्यात आल्यानंतर निरुपम यांनी पत्रकार परिषदेत मुनगंटीवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

मुनगंटीवार यांना वाघ मारण्यात अधिक रस असून त्यांच्यात आणि शिकाऱ्यांमध्ये साटेलोटे असल्याचे विधान निरुपम यांनी केले होते. तस्करांशी माझे संबंध जोडून निरुपम यांनी राजकीय हीनता दाखविली आहे. असे आरोप करून निरुपम यांनी सत्याचाच निर्घृण खून केला आहे. याबद्दल निरुपम यांच्याविरोधात न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे मुनगंटीवारांनी जाहीर केले होते. त्यानुसार आज त्यांनी चंद्रपूर जिल्हा न्यायालयात दावा ठोकला आहे.

Web Title: Claims against Forest Minister Mungantiwar's Nirupam