शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
3
"इंडिया आघाडी तीन कट रचतेय", घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
4
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
5
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
6
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
7
Rajkot Game zone Fire Accident: 'डेथ फॉर्म' भरलात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, गेम झोन मालकांनी ठेवली होती ही अट; राजकोट दुर्घटनेवर मोठा खुलासा
8
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
9
पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 
10
"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
11
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
12
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
13
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
14
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
15
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
16
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
17
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
18
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
19
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
20
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट

भुजबळ वैजापुरातून लढणार ही फक्त अफवा: आमदार चिकटगावकर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 3:24 PM

येवला मतदारसंघात भुजबळांना आगामी विधानसभा अडचणीची जाणार असल्याने ते वैजापूर मतदारसंघाची चाचपणी करत असल्याची चर्चेचे आमदार चिकटगावकर यांनी खंडन केले आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना राजकीय घडामोडींना वेग येत आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मतदारसंघाची चाचपणी करत असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत खुलासा करताना वैजापूरचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी ह्या फक्त अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. निवडणुकीला दोन महिने शिल्लक राहिले असल्याने लोकांकडून अशा गोष्टी जाणीवपूर्वक पेरल्या जात असल्याचे ही ते म्हणाले.

येवला मतदारसंघात भुजबळांना आगामी विधानसभा अडचणीची जाणार असल्याने ते वैजापूर मतदारसंघाची चाचपणी करत असल्याची चर्चेचे आमदार चिकटगावकर यांनी खंडन केले आहे. निवडणुका जवळ आल्या की काही  लोकांकडून अशा अफवा पसरवल्या जातात. छगन भुजबळ यांनी स्वताः कुठे अधिकृतरीत्या असा खुलासा केला नसल्याचे ही चिकटगावकर म्हणाले. अधिवेशनात भुजबळांशी माझी भेट झाली पण त्यावेळी सुद्धा त्यांनी याबाबतीत कोणतेही चर्चा केली नसल्याचे चिकटगावकर म्हणाले.

त्यांना जरा वैजापूरमधून उभे राहायचे असतील तर ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना बोलतील. स्थानिक आमदार म्हणून मला बोलतील व या विषयवार बैठक होईल त्यानंतर निर्णय होईल. कुणीतरी बोलले म्हणून भुजबळ वैजापूरमधून लढणार असे होत नाही, तसेच भुजबळ यांनी अशी कोणतेही इच्छा व्यक्ती केली नसल्याचेही चिकटगावकर म्हणाले.