शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मुले घरापेक्षा शाळेतच समाधानी, एनसीईआरटीचे सर्वेक्षण, ७३ टक्के बच्चे कंपनीच्या मनात ठासून आत्मविश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 11:52 AM

Education News: कोवळ्या वयातील नव्या पिढीमध्ये आत्मविश्वास ठासून भरला आहे. देशातील सहावी ते  बारावीपर्यंतची तब्बल ७० टक्के मुले जीवनाबाबत प्रचंड आत्मविश्वास बाळगतात, तर ७३ टक्के मुलांना घरापेक्षाही जास्त आनंद शाळेतच मिळतोय

- अविनाश साबापुरेयवतमाळ : अत्यंत धावपळीच्या आणि जीवघेण्या स्पर्धेच्या  जगात प्रौढ मंडळी आत्मविश्वास गमावून बसत आहे. मात्र, कोवळ्या वयातील नव्या पिढीमध्ये आत्मविश्वास ठासून भरला आहे. देशातील सहावी ते  बारावीपर्यंतची तब्बल ७० टक्के मुले जीवनाबाबत प्रचंड आत्मविश्वास बाळगतात, तर ७३ टक्के मुलांना घरापेक्षाही जास्त आनंद शाळेतच मिळतोय, असा आशादायक निष्कर्ष एनसीईआरटीने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आला आहे.

सोमवारी (दि. १४) देशभर बालक दिन साजरा होत असताना या ‘मेंटल हेल्थ ॲण्ड वेलबिइंग ऑफ स्कूल स्टुडंट्स’ सर्व्हेतील निष्कर्ष देशाच्या नव्या पिढीची मन:स्थिती स्पष्ट करीत आहे. सध्या शालेय जीवनात असलेली मुले अभ्यासात तरबेज होत असली तरी मानसिक पातळीवर त्यांच्या कोणत्या अडचणी आहे, हे जाणून घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण खाते व राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने देशभरातील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात २८ राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशातील तीन लाख ७९ हजार ८४२ विद्यार्थ्यांची मानसिक अवस्था जाणून घेण्यात आली. यात महाराष्ट्रातील १५ हजार ३८३ विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले गेले. विद्यार्थी आपल्या कुटुंबात खुश आहेत का, शाळेतील वातावरणात त्यांना आनंद मिळतो का, स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाबाबत समाधानी आहेत का, स्वत:च्या जबाबदाऱ्या त्यांना कळतात का, छोट्या-छोट्या गोष्टीवर ते चिडचिडेपणा करतात का, स्वत:च्या मनावरील ताण घालविण्यासाठी काही उपाय करतात का, त्यांना परीक्षेबाबत भीती वाटते का, अशा विविध प्रश्नांच्या आधारे शालेय विद्यार्थ्यांची मन:स्थिती जाणून घेण्यात आली. 

विशेष म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास असून, घरापेक्षाही शाळेतच अधिक आनंदी असल्याचे मत तब्बल७३%विद्यार्थ्यांनी नोंदविले. अनेक मुलांना ताणतणावाची समस्या आहे. त्यातील केवळ

२८%मुले ताण घालविण्यासाठी योगा करतात.  मन:स्वास्थ्याबाबत प्रतिसादnशरीरयष्टीबाबत समाधानी :     ५५%nवैयक्तिक जीवनात समाधानी :     ५१%nशालेय जीवनात समाधानी :     ७३%nस्वत:च्या वर्तनाबाबत जबाबदारी घेण्यास तयार :     ८४%nप्रश्न विचारल्यावर चिडतात :     २८.४%nसंवाद साधताना अडखळतात :     २३%nमित्रांसोबत अडचणी शेअर करतात :     ३३%nआत्मविश्वास आहे :     ७०%nपरीक्षेमुळे चिंता वाटते :     ८१%nएकाग्रता कमी आहे :     २९%nमूड अचानक बिघडतो :     ४३%

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाchildren's dayबालदिन