मुख्यमंत्र्यांनी 'मातोश्री'च्या बाहेर पडून राज्यात काय चालले आहे ते बघावे : माजी खासदार राजु शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 06:23 PM2020-08-27T18:23:16+5:302020-08-27T18:38:41+5:30

तुम्ही आम्ही मावसभाऊ दोघे मिळून वाटून खाऊ असे सुरू असल्याची टीका

The Chief Minister Uddhav Thackrey should step out of 'Matoshri' and see what is going on in the state: Raju Shetty | मुख्यमंत्र्यांनी 'मातोश्री'च्या बाहेर पडून राज्यात काय चालले आहे ते बघावे : माजी खासदार राजु शेट्टी

मुख्यमंत्र्यांनी 'मातोश्री'च्या बाहेर पडून राज्यात काय चालले आहे ते बघावे : माजी खासदार राजु शेट्टी

googlenewsNext
ठळक मुद्देमाजी खासदार राजु शेट्टींचे दुधदरासाठी जनावरांसह बारामतीत आंदोलन

बारामती : मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीच्या बाहेर पडून राज्यात काय चालले आहे ते बघावे. अलिबाबा चाळीस चोर कशा पद्धतीने चोरी करीत आहेत. यामध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सर्वच पक्षसहभागी आहे. तुम्ही आम्ही मावसभाऊ दोघे मिळून वाटून खाऊ असे सुरू असल्याची टीका शेट्टी यांनी केली.
  माजी खासदर राजू शेट्टी यांनी गुरुवारी (दि. २७) बारामती शहरात दुधदरासाठी जनावरांसह आंदोलन केले. शारदा प्रांगण येथून ढोलताशाच्या गजरात जनावरांना घेऊन मोर्चाला सुरवात करण्यात आली. आला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मोर्चाला पाठिंबा देण्यात आला. इंदापूर चौक, गुणवडी चौक, पानगल्ली मार्गे प्रशासनभवन येथे पोलिसांनी मोर्चा अडवला.यावेळी माजी खासदार शेट्टी यांनी सत्ताधाऱ्यांसह सर्वच पक्षनेत्यांना खडे बोल सुनावले . यावेळी सरकारी खरेदी होऊन देखील दुधाचे भाव वाढत नसल्याने ही दूध उत्पादकांची फसवणूकच आहे, असा आरोप करत त्यांनी दूध संघांनी दिलेल्या भावाची आकडेवारी वाचूनदाखवली. सरकारने दुध संघांना  २५ रुपये प्रतिलीटर दर दिला,मात्र,शेतकऱ्यांना १७ रुपये दर मिळाला. हे सगळे जर मुख्यमंत्री बघत असतील तर शेतकऱ्यांना हातात लोढणे का घेऊ नये असा संतप्त सवाल शेट्टी यांनी यावेळी केला.


     
 कोल्डड्रिंकसाठी १५० रुपये लिटर दर मिळतो.गोमूत्र आणि शेणाला दुधापेक्षा अधिक दर मिळतो. पाण्याची बाटली दुधापेक्षा महाग आहे. ही बाबराज्यकर्त्यांना शरम वाटावी, अशी आहे. अनेक जण दूध उत्पादकांच्या नावानेदरोडेखोरी करीत आहेत.दुध उत्पादनाचा खर्च प्रतिलीटर ३२ रुपये आहे.शेतकऱ्यांच्या हाती १७ रुपये मिळतात.जनावरांसाठी पशुखाद्य,वैद्यकीय उपचार,चाऱ्यासाठी शेतकरी पैसे आणणार कोठुन.राज्यकर्त्यांनी याचा विचारकरण्याची गरज आहे.हे धोरण न बदलल्यास जनावरे राज्यकर्त्यांच्या दारातनेवुन बांधण्याचा इशारा शेट्टी यांनी दिला.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी ५रुपयांचे अनुदान हे दूध उत्पादकांचा हक्क आहे. शांततेच्या मार्गाने बारामतीत येऊन आम्ही येऊन घामाचा दाम माग आहेत. वेळ पडल्यास जहाल आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला. प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम यांनी वेळपडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला. दशरथ राऊत यांनी देखील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.
------------------------------------
... दूध उत्पादकांना देशोधडीला लावण्याचे पाप
कोरोनामुळे राज्यातील दूध व्यवसायावर संक्रांत आली आहे. राज्यात दररोज११९ लाख लिटर दूध उत्पादन होते. सध्या त्यातील ५२ लाख लिटर दूध अतिरिक्तझाले आहे. दूध पावडरचा दर ३३० रुपयांवरून १८० रुपये प्रतिकिलोवर आला आहे.तसेच कोरोनामुळे निर्यात बंद आहे. देशात १.५ लाख टन, राज्यात ५० हजार टनदूध पावडर शिल्लक आहे. तरी देखील ‘केंद्र’ १० हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेऊन दूध उत्पादकांना देशोधडीला लावण्याचे पाप करीत आहे.२१ जुलै रोजी एक दिवसाचे दूध बंद आंदोलन करून देखील मायबाप सरकारला जाग आली नाही. उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने दूध विकावे लागत आहे. प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देऊन २५ रुपये दर द्यावा. अन्यथा कोणत्याही क्षणी बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
----------------------------------------
... सोशल डिस्टन्सचा फज्जा
कोरोना संसर्ग काळातील गेल्या पाच महिन्यातील हे पहिले आंदोलन आहे. मात्र
आंदोलन करताना  सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे चित्र पहायला मिळाले.काही कार्यकर्त्यांनी घोषणा देताना मास्क काढल्याचे चित्र होते. आंदोलनासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी देखील काहींनी सुरक्षित अंतरपाळले नसल्याचे दिसून आले.

Web Title: The Chief Minister Uddhav Thackrey should step out of 'Matoshri' and see what is going on in the state: Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.