The chief minister uddhav thackeray will visit the farmers and inspect the rain crisis | मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार, आसमानी संकटाची प्रत्यक्ष पाहणी करणार

मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार, आसमानी संकटाची प्रत्यक्ष पाहणी करणार

ठळक मुद्देयेत्या सोमवारी (दि.१९) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

मुंबई : राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आसमानी संकटांमुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. त्यामुळे परतीच्या पावसामुळे झालेल्या पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना भेटण्यासाठी येत्या सोमवारी (दि.१९) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचा असा असेल दौरा...
- सकाळी 09:00 वा. सोलापूर विमानतळ येथे आगमन व मोटारने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण
- सकाळी 09:30 वा.सोलापूर येथून मोटारने सांगवी खूर्द ता. अक्कलकोट, जि. सोलापूरकडे प्रयाण (अक्कलकोट मार्गे), 
- सकाळी 10:45 वा. सांगवी खूर्द येथे आगमन व नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा 
- सकाळी 11:00 वा. सांगवी पूलाकडे प्रयाण व बोरी नदीची व पूरग्रस्त भागाची पाहणी, 
- सकाळी 11:15 वा. अक्कलकोट शहरकडे प्रयाण, 
- सकाळी 11:30 वा.    अक्कलकोट शहर येथे आगमन व हत्ती तलावाची पाहणी, 
- सकाळी 11:45वा.    अक्कलकोट येथून रामपूकडे प्रयाण,
- दुपारी 12:00 वा.रामपूर येथे आगमन व अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी
- दुपारी 12:15 वा.रामपूर येथून बोरी उमरगे ता. अक्कलकोटकडे प्रयाण,
- दुपारी 12:30 वा.बोरी उमरगे येथे आगमन आपत्तीग्रस्त घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी, 
- दुपारी 12:45 वा.बोरी उमरगे ता. अक्कलकोट येथून सोलापूरकडे प्रयाण,
- दुपारी 03:00 वा. पूरपरिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा, नंतर  सोलापूर विमानतळ येथे आगमन व मुंबईकडे प्रयाण

देवेंद्र फडणवीस सुद्धा शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करणार
नुकसानग्रस्त शेतकर्‍याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे येत्या १९ ऑक्टोबरपासून ३ दिवसांचा दौरा करणार आहेत. देवेंद्र फणडवीस आपल्या दौऱ्याची सुरुवात बारामतीपासून करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा इत्यादी ठिकाणी दौरा करून ते उस्मानाबादकडे रवाना होतील. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर दुसर्‍या दिवशी २० ऑक्टोबरला उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. तिसर्‍या दिवशी २१ ऑक्टोबरला रोजी हिंगोली, जालना, औरंगाबादचा ते दौरा करतील. या तीन दिवसांत ९ जिल्ह्यांमध्ये सुमारे ८५० किलोमीटरचा प्रवास ते करणार आहेत.

शरद पवार उद्यापासून दौऱ्यावर
याचबरोबर, या आसमानी संकटांमुळे शेतकरी पुरता हवालदिल हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करणार आहेत. शरद पवार हे उद्यापासून दोन दिवसांचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तुळजापूर, उमरगा,औसा, परांडा, उस्मानाबाद भागाची पाहणी करणार आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The chief minister uddhav thackeray will visit the farmers and inspect the rain crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.