शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

...अशावेळी नागरिकांनी गाफील राहून चालणार नाही, मुख्यमंत्र्यांचा सूचनावजा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 19:32 IST

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) च्यावतीने अठरा दिवसात शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ३२ हजार चौरस मीटर मैदानावर १३ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे जम्बो हॉस्पिटल उभारण्यात आले.

ठळक मुद्देकेंद्र शासनाने डिसेंबरपर्यंत कोरोनावरील लस येईल असे सांगितले असले तरी, पुढील चार महिने आपल्याला विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.

पुणे : जम्बो हॉस्पिटलची खरोखरच गरज आहे का अशी विचारणा होत आहे. परंतु, जगात कोरोनाची एक लाट  ओसरल्यावर दुसरी लाट आलेली आहे. ही दुसरी लाट येऊ नये म्हणून सर्वच जण प्रयत्न करीत आहेत. अशावेळी गाफील राहूनही चालणार नाही. त्यामुळे या जम्बो हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे. आज या हॉस्पिटलचे उद्घाटन झाले असले तरी, या जम्बो हॉस्पिटलची गरज कोणत्याही रूग्णांना पडू नये, हे हॉस्पिटल आहे, तसेच रिकामी राहो. अशा शुभेच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) च्यावतीने अठरा दिवसात शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ३२ हजार चौरस मीटर मैदानावर १३ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे जम्बो हॉस्पिटल उभारण्यात आले. या हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभ रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते ऑनलाईन झाला. यावेळी हॉस्पिटलच्या आवारात उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलिस आयुक्त डॉ के. व्यंकटेशम, पीएमआरडीएचे सुहास दिवसे आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, गेल्या अठरा दिवसात भर पावसात हे हॉस्पिटल उभे केले गेले याचा मोठा आनंद आहे. कोणत्याही वादळाला तोंड देईल असे हे जम्बो हॉस्पिटल आहे़ परंतु, या हॉस्पिटलमधील उभ्या केलेल्या ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडच्या सुविधांची गरज नागरिकांना पडू नये हीच आपली गणरायाकडे प्रार्थना आहे. कोरोनाच्या आपत्तीमुळे यंदा पंढरीची वारीही सुनी सुनी झाली. सर्व धर्मीय आपल्या उत्साहास बाजूला ठेऊन आपले सण साधेपणाने साजरे करीत आहे. 

केंद्र शासनाने डिसेंबरपर्यंत कोरोनावरील लस येईल असे सांगितले असले तरी, पुढील चार महिने आपल्याला विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. गणेशोत्सव, मोहरम, जैन बांधवांचे सण आदी सर्व सण सोबत आले असतानाच, पाऊस व कोविडची साथ यामुळे आपल्याला अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. लॉकडाऊनची बंधने कमी करताना गर्दी होणे हे अपरिहार्य आहे. अशावेळी नागरिकांनी मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टसिंगचे पालन करणे आदी खबरदारी घेणे महत्वाचे असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. 

आज हॉस्पिटल सुरू झाले म्हणजे लगेचच रूग्णांची अपेक्षा करू नका - अजित पवार शिवाजीनगर येथे रविवारी जम्बो हॉस्पिटलचे उद्घाटन झाले परंतु,  अद्यापही तेथे एकही कोविडचा रूग्ण नाही असेही आता बोलले जाईल. पण रविवारी उद्घाटनानंतर या हॉस्पिटलमर्धील सर्व यंत्रणा, सामुग्री निर्जतुंकीकरण करण्यात येणार असून, यासाठी दोन दिवस लागतील. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये मंगळवारनंतरच रूग्ण दाखल करण्यात येणार आहेत. असे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट करीत, हॉस्पिटल सुरू झाले पण अद्याप रूग्ण नाही या चर्चेच्या पूर्वीच पूर्णविराम दिला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेPuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAjit Pawarअजित पवार