शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत भारतीय IT कर्मचाऱ्यांसाठी 'टेन्शन'! H-1B व्हिसा मिळणं ७०% नी घटलं; TCS चाही रिजेक्शन रेट वाढला!
2
Nanded Murder Case : "तुझ्या बहिणीचं ज्याच्यासोबत लफडं त्याला मारुन ये....", सक्षमला मारण्याआधी पोलीस चौकीतील घटनाक्रम; आंचलने सांगितली धक्कादायक माहिती
3
श्रेयस अय्यरसोबत रिलेशनशिपच्या चर्चांवर अखेर मृणाल ठाकूरने सोडलं मौन; म्हणाली...
4
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
5
"पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
6
चुकीच्या वेळी दूध प्यायल्याने मुलांच्या वाढीवर परिणाम? सकाळ की संध्याकाळ... 'ही' आहे सर्वोत्तम वेळ
7
लग्नासाठी ऑनलाइन वधू शोधत होता अन् लागला ४९ लाखांचा चुना; पीचडी करण्याऱ्या तरुणासोबत काय घडलं?
8
स्वस्त झाला सिलिंडर; आजपासून किती रुपयांना मिळणार, पाहा ATF च्या किंमतीत किती झाला बदल?
9
भारतीय युवकानं नाकारली ६७ लाखांची जॉब ऑफर; 'वर्क फ्रॉम होम'पासून का काढतायेत पळ? समोर आलं कारण
10
Ajit Pawar: जाहीर सभेत अजित पवारांचा 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख; दादा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले...
11
काळीज हेलावणारी घटना! ७ वर्षांच्या लेकाला वाचवण्यासाठी धावली, आणि भरधाव बसने आईला चिरडले; तीन लेकरांसमोर मातेचा मृत्यू
12
वैभव सूर्यवंशीचा टीम इंडियात धमाका; बिहारमध्ये गेल्यावर बॅटला लागलं 'ग्रहण'
13
खळबळजनक! 'तो' वाद टोकाला गेला, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशीच विवाहितेसोबत घडलं भयंकर
14
'तुम्ही चर्चा करत नाही, तो ड्रामा'; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
15
SIP ला लावा 'टॉप-अप'चा बुस्टर! दरवर्षी रक्कम वाढवा आणि तुमचं आर्थिक लक्ष्य वेळेआधी पूर्ण करा!
16
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक समायोजनाला बसला ब्रेक, समायोजन स्थगित; आता २०२५-२६ च्या संचमान्यतेनंतरच प्रक्रिया
17
हनिमूनच्या रात्री नवरी फक्त 'हे' म्हणाली, नवरदेव निघून गेला अन् परतलाच नाही; नेमकं काय घडलं?
18
नोकरी करणं गरज नाही तर केवळ छंद राहिल; Nikhil Kamath यांच्या पॉडकॉस्ट मध्ये Elon Musk यांची भविष्यवाणी
19
स्मृती मंधानाला चीट केल्याची चर्चा, लग्नही पुढे ढकललं; सर्व प्रकारानंतर पलाश मुच्छल पहिल्यांदाच दिसला
20
चायनामन कुलदीपची कमाल! शेन वॉर्नचा २३ वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाज मोर्चेकऱ्यांशी मुख्यमंत्री करणार चर्चा

By admin | Updated: September 6, 2016 05:00 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाच्या मोर्चेकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न समजून घेणार आहेत

यदु जोशी,

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाच्या मोर्चेकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न समजून घेणार आहेत. चालू महिन्याअखेर ही चर्चा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आज गणरायाचे आगमन झाले. मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी अमृता यांनी पूजन केले. मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री सरिता, कन्या दिविजा आणि इतर कुटुंबीय भक्तिरंगात रंगले होते. गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मराठा समाजाचे प्रचंड मोर्चे सध्या निघत आहेत. मोर्चाच्या वतीने स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली जात आहेत. एकूण २० ठिकाणी मोर्चे निघणार असल्याची आमची माहिती आहे. या मोर्चांनंतर मोर्चांच्या प्रतिनिधींशी मी स्वत: चर्चा करेल. या मोर्चांचे नेते म्हणून कोणीही समोर येताना दिसत नाही. त्यातही राजकीय नेत्यांना मोर्चेकऱ्यांनीच दोन हात दूर ठेवले आहे. अशावेळी सरकार नेमके कोणाशी चर्चा करणार या प्रश्नात मुख्यमंत्री म्हणाले की जिल्ह्याजिल्ह्यात या मोर्चाचे आयोजक कोण आहेत, त्यांच्या संघटना कोणत्या याची माहिती सरकारकडे आहे. त्या आधारावरच चर्चा केली जाईल. चर्चेपासून राजकीय पक्षांच्या नेत्यांना दूर ठेवले जाईल, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करा, कोपर्डीतील बलात्काराच्या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या आणि मराठा समाजाला आरक्षण द्या, या मागण्या सध्या विशाल मोर्चांद्वारे केल्या जात आहेत. या मोर्चांदरम्यान कोणताही अनुचित प्रकार न होता अतिशय शांततामय पद्धतीने ते निघत आहेत. सूत्रांनी सांगितले की विशेषत: अ‍ॅट्रॉसिटीच्या कायद्यासंदर्भात मराठा समाजामध्ये असलेली अस्वस्थता दूर करताना दलित समाजालाही विश्वासात घेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल. या संवेदनशील विषयाचा राजकीय फायदा कोणालाही उचलू न देण्याची दक्षताही त्याचवेळी घेतली जाईल. >दलित समाजाचेही मोर्चेअ‍ॅट्रॉसिटीच्या कायद्याला सरकारने धक्काही लावू नये या मागणीसाठी दलित समाजाचे मोर्चे काढण्याचे नियोजन सुरू झाले आहे. परभणीमध्ये काल या संदर्भात एक मोठी बैठक झाली. मराठवाड्यात इतरत्रही बैठकी घेऊन मोर्चांचे आयोजन करण्याचे ठरले. या मोर्चांपासूनही दलित समाजातील प्रस्थापित नेत्यांना बाजूला ठेवले जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी आज लोकमतला दिली.