शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी उघड केली बिल्डरांची खेळी, मुंबईतील भाडेकरूंना हक्काचे घर

By admin | Updated: July 17, 2015 00:32 IST

मुंबई उपनगरातील जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींमधील भाडेकरूंची होत असलेली फसवणूक थांबवता यावी म्हणून आणि त्यांना हक्काचे घर मिळावे म्हणून याच अधिवेशनात

मुंबई : मुंबई उपनगरातील जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींमधील भाडेकरूंची होत असलेली फसवणूक थांबवता यावी म्हणून आणि त्यांना हक्काचे घर मिळावे म्हणून याच अधिवेशनात त्यासाठी कायदा केला जाईल, जर विधेयक आले नाही, तर वटहुकूम काढला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. त्याचवेळी भाडेकरूंच्या इमारतींच्या बाबतीत बिल्डर कसे वागतात याचे वर्णन मुख्यमंत्र्यांनीच स्वत: सभागृहात केले.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भाडेकरू, रहिवाशांनी बनविलेली यादी, मिळणारा एफएसआय, इमारत मालक, संस्था, विकासक यांना देणे, भाडेकरू, मालक, रहिवाशी यांच्या मालमत्तेच्या हक्कात बाधा येणार नाही असे सांगणे या गोष्टी धोरणाचा भाग म्हणून ठीक आहेत. त्या धोरणामुळे भाडेकरूंचा हक्क अबाधित राहतो; पण त्याला घराची शाश्वती उरत नाही. पाडली जाणारी इमारत किती काळात बांधून पूर्ण होईल याचे कोणतेही बंधन बिल्डरवर नसते. बिल्डर पळवाटा काढतात, घर मिळणार हे कागदावरच राहते. पण ते घर कधी मिळेल हेदेखील कळत नाही. यासाठी कायद्यातच बदल करावे लागतील. आपल्या विभागातर्फे यासाठीच्या कायद्याचा मसुदा याच अधिवेशनात आणला जाईल. जर ते शक्य झाले नाही, तर आपण अध्यादेश आणू असे या सभागृहातच घोषित करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.खोटे आॅडिट करणाऱ्यांवर कारवाई-स्ट्रक्चरल आॅडिट करतानाही खोटे आॅडिट करून इमारती रिकाम्या करून घेतल्या जातात. अशावेळी बिल्डरच्या दबावाखाली येऊन अधिकारी काम करतात. अशा दबावाखाली येऊन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवरदेखील कारवाई करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले. शिवाय ट्रांझीट कॅम्पमध्ये बेकायदा राहणाऱ्यांच्या संबंधी अनेक आमदार प्रश्न विचारत आहेत; त्यासाठी ट्रांझीट कॅम्पच्या संबंधी स्वतंत्र लक्षवेधी लावा, असेही मुख्यमंत्र्यांनीच सुचवले.दुर्घटनेची होती भीती- भाजपाचे अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. मुंबई शहर व उपनगरातील मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाश्यांना महानगरपालिकेच्या नियम ३५४ नुसार घरे रिकामे करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत; मात्र अशा इमारतींमधील रहिवाशांना पुन्हा आपले हक्काचे घर मिळेल याची कोणतीच शाश्वती नसल्यामुळे रहिवासी घर सोडायला तयार होत नाहीत. त्यामुळे अशा इमारती कोसळून दुर्घटना घडतात, असेही भातखळकर म्हणाले. या चर्चेत आ. आशिष शेलार, आ. योगेश सागर, आ. मंगलप्रभात लोढा, आ. राज पुरोहित आदींनीही भाग घेतला.