शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"एकट्या शिंदेंची जबाबदारी नाही"; निर्णयांना स्थगितीचा मुद्दा, CM फडणवीस स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 14:04 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णयाच्या स्थगितीवर बोलताना स्पष्टीकरण दिले आहे.

CM Devendra Fadnavis on Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या काही निर्णयांवरुन मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या काही निर्णयांना फडणवीस सरकारने स्थगिती दिली होती. तसेच एकनाथ शिंदेंनी केलेल्या नियुक्त्या फडणवीस सरकारने रद्द केल्या होत्या. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचे सरकार हे तिघांच्या समन्वयाने चालणारे सरकार असल्याचे म्हटलं आहे. स्थगिती संदर्भात राजकीय वर्तुळात असलेल्या चर्चांवर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयांना आणि नियुक्त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याचे म्हटलं जात आहे. नुकतेच एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अजय आशर यांना मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मित्र’ संस्थेच्या उपाध्यक्षपदावरून हटवल्याचे समोर आलं. त्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. खालच्या स्तरावर चर्चा करुनच काही निर्णयांना स्थगिती देण्यात आली आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"गेल्या काही काळापासून माध्यमांमध्ये फडणवीसांनी शिंदेंच्या प्रोजेक्टला स्थगिती दिली ही बातमी आवडती झाली आहे. पहिल्यांदा लक्षात ठेवा स्थगिती देण्यासाठी मी उद्धव ठाकरे नाही. जे जे राज्याच्या हिताचे आहे ते सुरु करत असताना एकनाथ शिंदे यांच्यासोबत मी आणि अजित पवार होतो. त्यामुळे घेतलेले जे निर्णय आहेत त्यांची जबाबदारी ही एकट्या एकनाथ शिंदेंची नाही आमच्या तिघांची आहे. प्रशासनात खालच्या स्तरावर गडबड होते. खालच्या स्तरावर चर्चा करुनच काही निर्णयांना स्थगिती देण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांनी त्यांच्या स्तरावर स्थगिती दिली तरी फडणवीसांचा दणका असं म्हटलं जात. एखाद्या खात्याच्या मंत्र्यांने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार स्थगिती दिली तरी फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या खात्याला स्थगिती दिली असं म्हटलं जातं. अजित पवार थेट अटॅक करतात त्यामुळे त्यांच्या वाटेला कोणी जात नाही," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"त्यामुळे एक गोष्ट सांगतो की हे समन्वयाने चालणारे सरकार आहे. या सरकारमध्ये आम्ही सगळे निर्णय तिघे मिळून घेतो. मंत्रिमंडळाच्या काही बैठका होतात. त्यापैकी काही बैठकांना अजित पवार असतात तर काही बैठकांना एकनाथ शिंदे असतात. तर काही बैठकांना दोघेही असतात. यावर जो आला नाही तो नाराज असं म्हटलं जातं. माध्यमांना क्वालिटीच्या बातम्या सापडत नाहीये आणि  विरोधकांना क्वालिटीची टीका करता येत नाहीये, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे